नांदेड। सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे कंधार तालुका अधिवेशन ३१ डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील गट साधन केंद्रात दुपारी एक ते चार या वेळेत संघटनेचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा उपाध्यक्ष कॉ.दत्ता शिंदे, कॉ. शिवाजी वारले आणि कॉ.मारोती केंद्रे यांची उपस्थिती होती. आयोजन कमिटीचे प्रमुख तथा कंधार तालुका अध्यक्ष कॉ.माधव आंतापुरे यांनी वार्षिक आढावा अधिवेशनापुढे मांडला आणि त्यावर चर्चा झाली.

पहिल्या सत्रात संघटनेचे सरचिटणीस तथा सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. आणि दि.८ जानेवारी रोजी शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती दिली. त्या मोर्चात कामगारांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.

डिसेंबर महिन्यात संपूर्ण जिल्हाभर तालुका निहाय अधिवेशने आणि मेळावे सुरु असून नूतन तालुका कमिट्या निवडण्यात येत आहेत. ३१ डिसेंबर रोजी कंधार तालुका कमिटीची निवड करण्यात आली असून फेर अध्यक्ष पदी कॉ.माधव अंतापुरे तर सचिवपदी कॉ.गजानन वडजे यांची एकमताने निवड झाली. उपाध्यक्ष पदी रामेश्वर सोनकांबळे व वनिताबाई साखरे, सहसचिव पदी विजयानंद वाघमारे व काशीबाई बयवाड तर कोषाध्यक्ष पदी नामदेव पवार यांची निवड करण्यात आली.

जिल्हा कमिटीच्या वतीने नूतन कमिटीचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या. सदरील अधिवेशनात कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.दत्ता शिंदेकॉ. शिवाजी वारले,कॉ.मारोती केंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. शालेय पोषण आहार कामगारांच्या अनुषंगाने राज्य सरकारने दि.१८ डिसेंबर रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला असून शापोआ कामगारांना कामावरून कमी करण्या संदर्भातील शालेय शिक्षण समिती व मुख्याध्यापकांचे अधिकार कमी केले असून गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले आहेत. या शासन निर्णयाचे स्वागत संघटनेने केले आहे.

अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली किंवा जवळ आली की सरपंच व शालेय शिक्षण समितीचे लोक नाहक त्रास दित असल्याच्या अनेक तक्रारी सीटू संघटनेने मंत्रालयीन पातळीवर सातत्याने मांडून योग्य पाठपुरावा केल्यामुळे हे यश आले असल्याचे मत कॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले.

८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर रेल्वे स्टेशन नांदेड येथून दुपारी १२: ३० वाजता धडक काढण्यात येणार असून या मोर्चाचे नेतृत्व राज्य फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.डॉ.अशोक थोरात आणि संघटनेचे अध्यक्ष कॉ.विजय गाभने हे करणार आहेत. अशी माहिती सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version