नांदेड,शेख चांदपाशा| भाजपचे सुधीर मनगुंटीवार यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखा चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला आहे. सुधीर मनगुंटीवार यांचे हे वक्तव्य अत्यंत विकृत स्वरूपाचे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे अशी भावना डॉक्टर रेखा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील सभेत गलिच्छ – घाणेरडे वक्तव्य करून बहिण भावाच्या पवित्र नात्यांला बदनाम केले आहे. त्यांचे हे वक्तव्य हजारो महिलांसमोर भर सभेत झाले. हे विधान ऐकताना महिलांनमध्ये लज्जा उत्पन्न झाली.

असे वक्तव्य करून महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावी रेखा चव्हाण यांनी दिला आहे. आज त्यांनी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे रीतसर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कठोर कारवाई करावी या संदर्भात मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या नांदेड महानगराध्यक्षा डॉ. करुणा जमदाडे, जेसिका शिंदे, सुचिता पाटील, संगीता कदम, शिवनंदा देशमुख, सुजाता पाटील, विमल ढवळे सह अन्य महिलांची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version