हिमायतनगर। मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे इतिहास विभागाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला, सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदवर्ते ह्या होत्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ लक्ष्मण डोंगरे हे होते, तसेच व्यासपीठावर स्टॉप सेक्रेटरी प्रा.डॉ.डि.के कदम आणि महाविद्यालयातील नॅक समन्वयक प्रा.डॉ.गजानन दगडे हे उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाची सुरुवात बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि शिवरायांचा जयघोष करणाऱ्या स्फूर्ती गीताने करण्यात आली, सुरुवातीला महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचे शिवचरित्रावर सुंदर भाषणे झाली त्यानंतर प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉ लक्ष्मण डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतावादी राजे असून ते दुर्जनांचे निर्धालण करून सज्जनांचा सांभाळ करणारे जाणतेराजे होते, तसेच ते संबंध मानव जातीच्या इतिहासातील एक महान व पराक्रमी युगनिर्माते असुन त्यानी भारत भूमीवर पहिल्यांदा रयतेचे राज्य निर्माण करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांनी केले,असे ते म्हणाले.

प्रा.डॉ.डी .के. कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभाव निर्माण करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याची संकल्पना मध्ययुगीन कालखंडात पहिल्यांदा रुजवली ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच समजावी लागेल,तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम म्हणाल्या की, महाराजांना माणसांची उत्तम पारक होती त्यांनी स्वराज्य उभे करीत असताना रक्ताच्या नात्यापेक्षा रयतेच्या नात्याला अधिक महत्त्व दिले.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राज्यशाहीत लोककल्याणाची सतत तळमळ करणारे या भूतलावरील एकमेव राजे होते म्हणूनच या महान राजाची लोकशाही शासन व्यवस्थेत देखील पावलोपावली आपल्याला आठवण येते. सदरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत कदम यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार, कुमारी वैष्णवी वडटतवाड आणि कुमारी ज्योती बनसोडे यांनी केले, सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version