नवीन नांदेड| माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रथमच नांदेड आगमन निमित्ताने नवीन नांदेड भागातील पदाधिकारी व कार्यकर्त यांनी हडको ते मोढा ,विमानतळ नांदेड चारचाकी व दुचाकी रॅलीला भव्य प्रतिसाद मिळाला आहे.

नवनिर्वाचित राज्यसभेचे भाजपा खासदार अशोकराव चव्हाण हे २३ फेब्रुवारी नांदेड शहर आगमण निमित्ताने शहरात येत असल्याने नवीन नांदेड भागातील खा. चव्हाण समर्थक यांनी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत हडको सिडको, संभाजी चौक, नवीन कौठा, जुना कौठा मार्ग, वजिराबाद, आयटी आय, विमानतळ येथे चार चाकी, दुचाकी वरून रॅली काढली.

यामध्ये सतिश बसवदे,सौ.ललिता शिंदे बोकारे, माजी नगरसेविका मंगला गजानन देशमुख,उदय देशमुख,माजी नगरसेवक राजु पाटील काळे,सिध्दार्थ गायकवाड,संजय इंगेवाड,संजय मोरे, सौ.वैजयंती भिमराव गायकवाड,राजु लांडगे, ज्योती संदीप कदम,दलित मित्र माधव अंबटवार,दलित मित्र नारायण कोलंबीकर,बाबुराव आवनुरे, गिरीधर मैड,विनायक अकुरगे,विनोद कांचनगिरे,अमोल जाधव,अक्षय मुपडे,नितीन वाघमारे, शिवराज देशमुख,देविदास कदम,ओसाजी कदम, शंकर बंसवते, रामराव जावरे,शंकर नाईक, ओमप्रकाश शिरेवार ,शुभम गोपिनवार,यांच्या सह समर्थक कार्यकर्त,महिला मोठया प्रमाणात या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, तर भाजपाचे संजय पाटील घोगरे,नवनाथ कांबळे,ऋषीकेश मैड, ओमप्रकाश शिरेवार,शुभम गोपिनवार हेही सहभागी झाले,आगमण झाल्यानंतर यांनी भव्य दिव्य ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. लवकरच नवीन नांदेड भागातील काँग्रेस पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनीधी हे समर्थक माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शन खाली खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version