नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा यात्रेत दिं.20डिसेंबर रोज कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी सचिन गिरी,नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत,जिल्हा कृषी अधीक्षक बराटे साहेब,नायगाव पोलीस स्टेशन चे सहाययक पोलीस निरीक्षक महादेव पुरी,कृषी विभागाच्या आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक गवळी साहेब, कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे अधीक्षक व्यंकट शिंदे,शास्त्रज्ञ अंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक घुंगराळ्याचे प्रभारी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी केले. या कार्यक्रमात शेतकरी, कृषी विभाग, नायगाव, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी,महिला बचत गट यांचे वेगवेगळ्या प्रकारचे 25 स्टॅआल लावण्यात आले. यामध्ये हळद, तूर,सीताफळ, पेरू,तूर,बाजरी,टोमॅटो, मिरची,फळांचे ज्यूस, हर्बल साबण,मध,लोणचे यांचे स्टॅआल लावण्यात आले. तसेच कुंटुर येथील महिला बचत गटाच्या महिलांनी लोकरापासून बनलेली घोंगडी,स्वेटर, टोपी विक्रीसाठी आणले होते.

या कृषी प्रदर्शनाचे आयोजन तालुका कृषी कार्यालय नायगाव, व घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालय, पंचयात समिती कृषी विभाग नायगावच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. उपस्थित शेतकऱ्यांना तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत घुंगराळा व कृषी विभाग नायगाव,पंचायत समिती कृषी विभाग नायगाव च्या वतीने नायगाव तालुक्यातील 50 उत्कृष्ट शेतकऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच फवारणी करण्याकरिता शेतकऱ्यांना फवारणी किटचे ही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी घुंगराळ्याचे प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील,नायगाव चे तालुका कृषी अधिकारी वरपडे साहेब,BSF कंपणीचे शहादत्त गिरी,ग्रामसेवक शिंदे ,कृषी अधिकारी टी. जी. सुगावे, मंडळ अधिकारी कानगुले,तलाठी शुभम पाटील,डावरगावे, कृषी सहायक शिंदे मॅडम, कृषिरत्न हायटेक नर्सरीचे संचालक शितल पाटील यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास बालाजीराव मातावाड, अच्युतराव ढगे,नागोराव दंडेवाड,सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्यामराव यमलवाड, व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश पा. ढगे,ग्रामपंचायत सदस्य सुनील यलपलवाड, गंगाराम सूर्यवंशी, संतुक पा. ढगे, रोहित ढगे,व्यंकटराव कंचलवाड,शालेय समिती अध्यक्ष माधवराव ढगे,संभाजीराव तुरटवाड,माजी उपसरपंच शिवाजी पा.ढगे,प्रल्हाद पा. ढगे,बालाजीराव हाळदेवाड ,मोहन पा. सुगावे, किसन पा. ढगे, मुरहरी तुरटवाड ,गोविंदराव पा. शिंदे, सखाराम सुगावे ,मारोतराव कंचलवाड,माधवराव पा. ढगे,गणेश गिरी,एस. के. गजभारे,संजय सूर्यवंशी, शेषराव पा.ढगे,गंगाधरराव बोधनकर, अच्युत पांचाळ, बालाजी पांचाळ, माधवराव जलदेवार, साईनाथ सुगावे, गंगाधर ढगे,सूरज सुगावे, सचिन सुगावे,माधव सूर्यवंशी,अरुण सूर्यवंशी, सुग्रीव गजभारे, प्रकाश गजभारे ,महेबूब शेख,सोहेल शेख,शादुल शेख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरगावे सर,व ग्रामसेवक शिंदे साहेब यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version