
नविन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये मोठया प्रमाणात नियोजित बांधकामा पेक्षा जास्त प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाले असून केवळ प्रशासनाने नोटीस देऊन संबंधित बांधकाम धारकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असून संबधित बांधकाम धारकांना तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी माजी भाजपा नगरसेविका सौ. शांताबाई गोरे प्रतिनिधी माजी नगरसेवक राजु गोरे यांनी सहाय्यक आयुक्त संभाजीराव कास्टेवाड यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये नव्याने वस्ती वाढ मोठया प्रमाणात झाली असून या प्रभागात होणाऱ्या बांधकाम मुळे मोठया प्रमाणात बांधकाम निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे, नियोजित बांधकाम क्षेत्रापैक्षा संबधित अनेकांनी चार, पाच, सहा मजली बांधकाम केले आहे तर प्रत्यक्ष बांधकाम दोनच मजले असतांना मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत.
यापुर्वी मनपा आयुक्त यांना अनाधिकृत बांधकाम प्रकरणी देण्यात आली होती परंतु प्रशासनाने केवळ संबधित बांधकाम धारकांना नोटीस बजावली परंतु कार्यवाही काहीही केली नाही, या प्रकरणात अनाधिकृत बांधकाम करणारे मालमत्ता धारक, अनाधिकृत ईमारत निरीक्षक, कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या वरही कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.
म्हाडा कॉलनी वसाहत नवीन कौठा येथे मुख्य रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम करणारायावर तात्काळ कार्यवाही करुन जुना कौठा गावठाण येथे वारसांना प्रमाणे तात्काळ नाव परिवर्तन करून द्यावे व अनाधिकृत बांधकाम प्रकरणी लाखो रुपये महसूल बुडवणाराया मालमत्ता धारकांना व संबधित अधिकारी, कर्मचारी यांच्यी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त कास्टेवाड यांच्या कडे केली असून मनपा आयुक्त यांनाही भेट घेऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
