नांदेडसोशल वर्क

सिडको सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी दिंगाबर शिंदे यांच्यी निवड

नवीन नांदेड। सिडको सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचा अध्यक्षपदी पत्रकार दिंगाबर शिंदे, तर सामाजिक कार्यकर्ते राजु लांडगे,सचिवपदी दिपक भरकड यांच्या सह अन्य पदाधिकारी निवड जिजाऊ सृष्टी येथे एका झालेल्या बैठकीत करण्यात आली.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ, जिजाऊ बिग्रेड, संभाजी बिग्रेड,शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद आयोजित २०२४ पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी पत्रकार याची बैठक २ फेब्रुवारी रोजी जिजाऊ सृष्टी येथे आयोजित करण्यात आली होती, प्रारंभी उपस्थितांनी जिजाऊ माता यांना अभिवादन केले, यावेळी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,युवा शक्ती गुप्रचे संजय पाटील घोगरे, सामाजिक कार्यकर्ते, वैजनाथ देशमुख,राजु लांडगे,प्रा.मधुकर गायकवाड, राज्य पुरस्कार प्राप्त जयवंत काळे, दिलीप कदम, साहेबराव गाढे,यांच्या सह पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी १९ फेब्रुवारी २४ रोजी होणाऱ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी पत्रकार दिंगाबर शिंदे तर उपाध्यक्ष राजु लांडगे,संदीप कदम,वैजनाथ देशमुख, सचिव दिपक भरकड सह सचिव नामदेव चव्हाण, कोषाध्यक्ष वसंत कदम,सह कोषाध्यक्ष गोविंद मजरे,कार्याध्यक्ष हिवराळे, संघटक गजानन पवार,प्रसिध्दी प्रमुख गंगाधर नंदेवाड,व परिसरातील सर्व पत्रकार,यांच्या सह कार्यकारिणी घोषणा करण्यात आली.

कार्यकारिणी घोषणा नंतर पदाधिकारी यांच्ये अभिनंदन करण्यात आले असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे सांगून भव्य मिरवणूक, सामान्य ज्ञान स्पर्धा, लेझीम स्पर्धा , महिलांसाठी विविध कार्यक्रम,व्याख्यनमाला यासह अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे सांगून शिवजन्मोत्सव समितीला सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन समिती अध्यक्ष दिंगाबर शिंदे यांनी सांगितले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!