किनवट। यावर्षी तालुक्यातील सर्वात मोठी शिवजयंती 19 फेबुवारी रोजी साजरी करण्या संदर्भात हनुमान मंदिर घोटी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या वतीने व्यापक बैठक नुकतीच घेण्यात आली.त्या बैठकीत सर्वानुमते शिवजन्मोत्सव समिती 2024 च्या अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर बोंडारकर,उपाध्यक्ष पदी अमोल गरड,शुभम शिंदे,सचिव पदी राजू गायकवाड,अतुल थोटे तर कोषाध्यक्ष पदी सुनिल पावडे, सतीष खरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घोटी येथे तालुक्यातील सर्वात मोठी दिनांक 19 फेबुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्या संदर्भात एक व्यापक बैठक बोलावण्यात आली त्या बैठकीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या श्री.हनुमान मंदिर घोटी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्या बैठकीस सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2024 अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर बोंडारकर,उपाध्यक्ष पदी अमोल गरड,शुभम शिंदे,सचिव पदी राजू गायकवाड,अतुल थोटे तर कोषाध्यक्ष पदी सुनिल पावडे,सतीष खरे सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी, आविनाश कदम, अनिल पावडे,आकाश पवार, संदीप खरे, पंकज चटलेवार, सुहास गायकवाड,राहुल पावडे,, गजानन पवार, शंकर मगर, आदेश गरड, ओमकार पवार, गणेश गरड, कृष्णा मंनमंदे उपस्थित होते.
दिनांक 19 फेबुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य ढोलताशाच्या गजरामध्ये मिरवणूक आयोजित केली आहे.व सायंकाळी महाप्रसाद व दिनांक 22 फेबुवारी रोजी शिवव्याख्याते, श्री.सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान वेळ सायंकाळी ठिक 7 वाजता आयोजित केले आहे.तरी सर्व जनतेस समितीचे अध्यक्ष ज्ञानश्वर बोंडारकर आव्हान करते.