नांदेड| जर्मनीतील राजनीतिक अधिकारी डॉ. सुयश चव्हाण यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मायेची ऊब उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वहस्ते ब्लॅंकेटचे वाटप केले.

डॉ. सुयश चव्हाण हे २०१७ च्या बॅचचे आयएफएस विदेश सेवा अधिकारी आहेत. ते सध्या भारताचे जर्मनीतील राजनैतिक अधिकारी असून म्युनिक येथे कार्यरत आहेत. ते नेहमी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी जागतिक स्तरावर संघटन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जवळपास दीड हजार जिल्हा परिषदे च्या शाळेत जर्मन भाषा आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी जर्मन शाळेसोबत इंटरनेटने जोडणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांनी जर्मनीतील ऑडी कार कारखाना शेंद्रा औद्योगिक वसाहतीत उभारण्यासाठी त्रिस्तरीय सिटी करार केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मागासलेपणा दूर होण्यासाठी सहकार्य मिळाले आहे.वर्ष २०२२ मध्ये मुंबई येथे झालेल्या जागतिक उद्योग परिषदेत डॉ. सुयश यांना महाराष्ट्र शासनाने विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते.

वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमाच्या ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, जीएसटी आयुक्त पावडे, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. यशवंत चव्हाण , अभियंता रमेश मुत्तेपवार, डॉ. बालाजी सुधाकर जबडे, रोहन मुत्तेपवार, खुशबू मुत्तेपवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ. सुयश असे सांगितले की,आपल्या मातीशी सामाजिक बांधिलकी रहावी म्हणून चि.अर्श या स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त संध्या छाया वृद्धाश्रमात मायेची ऊब उपक्रमांतर्गत ब्लॅंकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला. दिलीप ठाकूर व त्यांची टीम जे सेवा कार्य करत आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. यावेळी प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी मायेची ऊब उपक्रमात आत्तापर्यंत लोकसभागातून एकूण १२०० ब्लॅंकेट जमा झाले आहेत.

उद्दिष्ट पूर्तीसाठी ८२४ ब्लॅंकेटची आवश्यकता आहे. वीस ब्लॅंकेटसाठी रुपये चार हजाराची मदत करणाऱ्या दानशूर नागरिकांची नावे ब्लॅंकेट वर छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार आहे.चाळीस दिवस दररोज सोशल मीडियाद्वारे पन्नास हजार लोकांपर्यंत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामाजी सरोदे यांनी तर आभार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम टर्के पाटील यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, संतोष भारती यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version