नांदेड। नांदेड ते आयोध्या ३ विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्यामुळे आणि २२ जानेवारी २०२४ ला सार्वजनिक सुट्टी मिळाल्यामुळे सर्वप्रथम अशी मागणी करणारे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतिया व डीआरयुसीसी मेंबर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी डीआरएम निधी सरकार यांना दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेटून नांदेड ते आयोध्या विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. त्यावेळी डीआरएम यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव तात्काळ पाठवला होता. त्यानुसार नांदेड येथून अयोध्येला जाण्यासाठी तीन रेल्वेची मंजुरी आली आहे. त्यामध्ये ४ फेब्रुवारी रोजी जालना – अयोध्या (०७६४९) ही रेल्वे परभणी, पूर्णा, नांदेड मार्गे धावणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी ही रेल्वे अयोध्या ते जालना (०७६४९)  धावणार आहे.१४ फेब्रुवारी नांदेड- आयोध्या (०७६३६) ही विशेष रेल्वे छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात १६ फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद – अयोध्या (०७२९७) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवा मार्गे अयोध्या येथे जाईल. २१ फेब्रुवारी रोजी या रेल्वेचा परतीचा प्रवास होईल. या तीन रेल्वे सुरू झाल्याबद्दल भारतीया व ठाकूर यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

ॲड.दिलीप ठाकूर,प्रा.अवधेशसिंग अशोकसिंग सोळंकी यांनी दि. ५ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून २२ जानेवारी या ऐतिहासिक दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.तसेच जिल्हा प्रशासनाकडे देखील स्थानिक सुट्टी जाहीर करावी म्हणून निवेदन दिले होते. या बाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी तशा प्रकारची मागणी केली. परंतु सर्वात प्रथम ही मागणी केल्याबद्दल ॲड. ठाकूर व प्रा.सोळंकी यांचे अनेकांनी कौतुक केले. दिलीप ठाकूर यांच्या या समय सूचकता व तत्परतेबद्दल रामभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version