
लोहा। निवडणूक प्रक्रियेचे काम आटोपून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे व टीमचा पुढाकार आहे .
लोहा बस स्थानकात तसेच एसटी मध्ये स्वतः जाऊन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे नांदेड व लातूर लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करावे .मतदान आपला हक्क आहे .असे मार्गदर्शन करत आहेत.या उपक्रमामुळे मतदारांत मोठी जनजागृती होते आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोह्याच्या बस स्थानकात स्वाक्षरी मोहीम शुभारंभ करण्यात आला तसेच लोहा कंधार तालुक्यात गावोगावी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे .नांदेड लोकसभा साठी २६ तारखेला तर लातूरला ७ मे रोजी मतदान होत आहे.
या अनुषंगाने ज्या बुथवर ५०टक्क्यातून कमी मतदान झाले आहे असा मतदान केंद्रावर मतदान टक्केवारी वाढावी यासाठी अंगणवाडी कर्मचारी तसेच बचत गत शाळा स्तरावर जनजागृती प्रभात फेरी, ओला -सुका घन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी असा वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत .लोहा गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, कंधारचे वसंत मेंटकर याची स्वतंत्र टीम यासाठी कार्यरत आहे.
उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार।या स्वतः लोहा बसस्टँड मध्ये गेल्या त्याची नियंत्रण कक्षातून ( कट्रोलर ) माईकवर मतदाना बाबत माहिती दिली प्रवाशांनी नांदेड मध्ये असेल तर २६ तारखेला व लातूर मध्ये असतील ते ७मे रोजी लोकसभेसाठी मतदान करा.. घरोघरी एकच नारा…मतदान करा… मतदान करा…!मतदार राजा जागा हो…लोकशाहीचा धागा हो…! घरोघरी जागृती करू…१००टक्के मतदान करू ..! असा घोषणां त्यांनी देत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
त्यानंतर त्या बस मध्ये गेल्या प्रवाशांना त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले तहसीलदार विठ्ठल परळीकर, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून देत मतदान करा असे सांगितले .लोहा विधानसभा क्षेत्रात मतदान टक्केवारी वाढावी यासाठी लोहा विधानसभा क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. नायब तहसीलदार संजय भोसीकर, रेखा चामनर,अनिल परळकर, अशोक मोकले, राजेश गायंगे, तिरुपती मुंगरे, समन्वयक मन्मथ थोटे,सुरेश वंनजे, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे ,गंगाधर गोंटे, माधव भालेराव केंद्रप्रमुख मंगनाळे, हे सहकार्य घेत आहेत.
