विहिंप बजरंग दलातर्फे शौर्य यात्रेचे नांदेड शहरात उत्साहात सुरुवात

नांदेड। विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला साठ (६०) वर्षे पूर्ण होत आहे हे वर्ष विश्व हिंदू परिषदेचे षष्ठीपूर्ती वर्ष आहे या निमित्ताने वर्षभर देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्य विभागाच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या षष्ठीपूर्ती वर्षानिमित्ताने बजरंग दलाच्या वतीने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्काराचे व्यापक जनजागरण व्हावे तसेच हिंदू साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत.
हिंदूपदपातशाही रूपाने नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण सर्व हिंदू समाजाने करावे राष्ट्र जागरण कार्यातील महाराजांच्या योगदानाबाबत समाजातील महाराजांविषयीचा कृतज्ञतेचा भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पुढाकाराने सकल हिंदू समाजाच्या सहभागाने देवगिरी प्रांतामध्ये भव्य शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नांदेड जिल्ह्यात शौर्य जागरण यात्रेची सुरुवात नांदेड शहरात झाली असून शहरातील चौफाळा भागातून ५१ जोडप्यांमार्फत अभिषेक करून सुरुवात करण्यात आली, चौफाळा ते स्वामी समर्थ मंदिर कलामंदिर पर्यंत शौर्य जागरण यात्रा काढण्यात आली, या यात्रेत वारकरी वेशात लहान मुले, लाठी काठींचे कवायती करणाऱ्या युवतीं उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी मार्गावर अनेक व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी फुलांची उधळण करून तसेच पाण्याचे व थंड पेयाचे वाटप करून स्वागत करण्यात आले , नांदेड जिल्हाभरात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे , यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे करण्यात आले आहे.
