भिमराव आंबेडकर यांनी रुग्णालयात घेतली सुरेश गजभारे यांची भेट
नांदेड| आखिल भारतीय बौध्द महासभचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भिमराव आंबेडकर यांनी दि.२३ गुरुवारी नांदेड येथे येऊन आपले सिलेदार समता सैनिक दल प्रमुख तथा भारतीय बौध्द महासभचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजभारे आजारी असल्याने रुग्णालयात भेट घेऊन त्यांचे तब्येतीची चौकशी करून गजभारे कुटुंबियांना धिर दिला आहे.
आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाउपाध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख असंख्य तरुणाला ज्यानी आपल्या बँकेच्या सेवेतुन उद्योग उभारुन त्यांच आयुष्य घडवले आसे सामाजिक चळवळीतील सुरेश गजभारे हे सध्या एका गंभीर जिवघेण्या आजारासी झुंज देत आहे.त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे कुटुंब चिंताजनक आहे आश्या परिस्थितीत भारतीय बौध्द महासभचे प्रमुख भिमराव आंबेडकर यांनी आपल्या शिलेदारांच्या आरोग्याची काळजी पोटी व सुरेश गजभारे व त्यांच्या कुटुंबियांना धिर व आधार देण्यासाठी खास नांदेड दौऱ्यावर आले व त्यांनी थेट रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या आरोग्याची विचार पुस केली व त्यांना धिर दिला.
आश्या परिस्थितीत आपला नेता आपल्यासाठी शेकडो मैल अंतर पार करून आलेला पाहुन सुरेश गजभारे सुखावले व कुटुंबीयांना देखील आधार वाटला याच समाधान कुटुंबियांना वाटल यावेळी भिमराव आंबेडकर यांनी डॉक्टर व पदाधिकारी यांच्याशी चौकशी करून आवश्यक ती पुरवण्यासाठी सांगितले यावेळी भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव बि.एच.गायकवाड,महाराष्ट्र कोषाध्यक्ष विजय कांबळे,जिल्हाध्यक्ष यशवंत चावरे,रविकिरण जोंधळे,पि.एम.वाघमारे,धम्मपाल बनसोडे,सुभाष नरवाडे,कुमारस्वामी माने कृष्णा गजभारे युवराज मोरे आनंद झडते हारी कसबे,हौसाजी वारघडे,नरसिंग दरबारे सह आंदीची उपस्थित होती.