
हिमायतनगर। येथील प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे यात्रेला दिवसेंदिवस रंग चढू लागला असून, विविध स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला आहे. सोमवारी रात्री शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. यात हिमायतनगर तालुक्यातील सायप्रस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. चिमुकल्यानी मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थित सर्व पालक नागरिक व मंदिर समितीच्या वतीने ट्रॉफी व बक्षिसाची रक्कम देऊन सन्मानित करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
हिमायतनगर येथील परमेश्वर देवाची यात्रा अनाधिकाला पासून भरविली जाते आहे मागील काही वर्षापासून यात्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच बडबड गीत स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न झाली असून दिनांक 18 रोजी श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजेच सांस्कृतिक कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रात्री आठ वाजता मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड गुरुजी यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये शहर व ग्रामीण भागातील सहा शाळांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये हुतात्मा देवेंद्र पाटील कन्या शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बीसी इंग्लिश स्कूल हिमायतनगर राजा भगीरथ विद्यालय हिमायतनगर इंग्लिश मीडियम स्कूल हिमायतनगर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा हिमायतनगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या अंगे असलेल्या कला गुणदर्शनाचे प्रदर्शन करत उपस्थित पालकांचे मने जिंकली या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून श्री जाधव एस के, श्री वराडे सर, श्री बोंबीलगेवार सर यांनी काम पाहिले. पर्यवेक्षकांनी दिलेल्या गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवलेल्या सायपरस इंग्लिश मीडियम स्कूल खडकी फाटा तालुका हिमायतनगर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकाचे ट्रॉफी आणि पंधरा हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
तर दुसरा क्रमांक मिळविलेल्या आर एन एस इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हिमायतनगर ने दुसरा क्रमांक पटकावल्याने या शाळेच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचे पारितोषक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भिशी तालुका किनवट या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविले असून, या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक राजा भगीरथ विद्यालय हिमायतनगर च्या विद्यार्थ्यांनी मिळविले त्याचबरोबर उत्तेजनार्थ म्हणून दोन शाळांच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी मंचावर श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्कलवाड गुरुजी, वराडे सर, नाथा गांगुलवार, एन टी सर, जयराम शिंदे, मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, संचालक अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, दत्ता काळे, रामभाऊ सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंदे, मारोती विक्रम शिंदे, मारोतराव हेंद्रे, दशरथ हेंद्रे, आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सुरेख असं सूत्रसंचालन गोविंद शिंदे यांनी केले.
