श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। शासनाने गोवंशहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला असला तरी जनावरांना निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून ट्रक, चारचाकी वाहनांमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असून एका पेक्षा जास्त जनावरे वाहनात कोंबल्या जात असल्याने जनावरांना इजा पोहचत आहेत. याकडे मात्र वाहतूक पोलीसासह संबंधितांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
जनावरांची वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी. वाहतुकीमध्ये काळजी न घेतल्याने जनावरे आजारी पडण्याची आणि दगावण्याची शक्यता असते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून जनावरांची तपासणी करून घ्यावी. आजारी जनावरांना वेगळे करून त्यावर उपचार करावेत. आजारी जनावरांची वाहतूक टाळावी परंतु याकडे संबधितांकडून साफ दुर्लक्ष केल्या जात आहे.
जनावराची वाहतूक पाहता, रस्त्यावरुण भरधाव वेगाने चालणार्या वाहणात क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबल्या जात असल्याने जनावरांना इजा पोहचत आहेत,तर काही जनावराना यात आपला जिवही गमवावा लागत आहे, असे असतांना या गंबीर प्रकाराकडे चौका चौकात उभे राहून खाजगी छोटी वाहणे तपासणार्या वाहतूक पोलिसांनाही हा प्रकार दिसून येते परंतु कोणीही याबाबत कोणतीच दखल घेत नसल्याचे दिसून येते.रस्त्यावरील खड्डयांमुळे एकमेकांना जनावरे धडकत असल्याने त्यांना जखमाही होत असल्याचे दिसून आले.तर यात काहीचा जिव गेल्याचे पहावयास मिळत आहे.
जनावरांना अमानुषपणे वाहनांमध्ये कोंबून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक सुरू असतानाही वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत.रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेता अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची वेगळी शाखा देण्यात आली. शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक व वाहनांची कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. जनावरे नेणारे किंवा बाहेर गावाहून आणणारे वाहन बरोबर हेरून वाहनधारकाकडून टोल वसूल करीत असल्याचे दृष्टीस पडते.परंतु शासनाच्या गोवंशहत्या प्रतिबंधक कायद्याची या ठिकाणी कोणीच अमलबजावणी करतांना दिसत नाही ही बाब गंबीर आहे. ज्योतिबा खराटे, शिवसेना किनवट-माहूर विधानसभा क्षेञप्रमुख.