श्री.गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून रस्त्याच्या दुतर्फा बीज रोपण
नवीन नांदेडl श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयाचे संचालक डॉ.मनेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण स्थळ विभाग व अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण यांच्या प्रयत्नातून सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील तुलनेने पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा संस्थेने तयार केलेले विविध वृक्षाचे बीज रोपण २८ जुन २४ रोजी घेण्यात आला.
संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे,संस्थेतील अधिष्ठाता (वित्त) तथा रजिस्ट्रार डॉ. अरुणकुमार पाटील, अधिष्ठाता (विद्यार्थी कल्याण) प्रा.एस.बी.देठे, प्र.निर्माण स्थळ अभियंता संदीप पोतदार यांचे सह संस्थेतील प्राध्यापक, कर्मचारी, इतर कंत्राटी कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिति होती.
हा कार्यक्रम कंधार तालुक्या तील चौकी महाकाया या गावी व आसपासच्या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा घेण्यात आला. या कार्यक्रमा साठी गावातील मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले यात हनुमंतराव कदम सरपंच चौकी महाकाया, हौसाजी वडजे माजी सरपंच, राम राठोड तंटामुक्ती अध्यक्ष व राठोड उपसरपंच यांनी मोलाचे सहकार्य केले व हिरीरीने या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील अधिष्ठाता (वित्त) तथा रजिस्ट्रार डॉ.अरुणकुमार पाटील,अधिष्ठाता (विद्यार्थी कल्याण) प्रा.एस.बी.देठे, प्र. निर्माण स्थळ अभियंता श्री संदीप पोतदार,सुरक्षा आधिकारी हंबर्डे,लेखा विभागीतील जनार्धन रामपुरे व सुमित नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.