खा. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त संजय घोगरे यांच्या वतीने 300 किलो फुलांचा हार व विध्यार्थीना परिक्षा प्यॉडचे वाटप

नवीन नांदेड l युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष तथा माजी भाजयुमो शहर जिल्हा अध्यक्ष,नगरसैविका प्रतिनिधी सदस्य युवा नेते संजय पाटील घोगरे यांच्या वतीने जेसीबीचा सहाय्याने ३०० किलो विविध फुलांचा हार घालून माजी खासदार चिखलीकर यांचे भव्य स्वागत हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले, यावेळी शालेय साहित्य म्हणुन ५ हजार विधार्थी परिक्षा प्यॉडचे वाटप ऊदाघटन सोहळा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको परिसरातील युवा नेते तथा युवा शक्ती मित्र मंडळ अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने हडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकाळी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्ये आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले,, यावेळी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर भव्य दिव्य तिनशे किलो वजनाचा विविध फुलांची आरस असलेला पुष्पहार जेसीबी चा साहाय्याने घालून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले,यावेळी सिडको हडको परिसरातील माजी पदाधिकारी संदीप चिखलीकर,उदय देशमुख, संजय इंंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, सतिश बसवदे, राजु लांडगे, यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे याही नांदेड दक्षिण भागातील अनेक गावातील व सिडको हडको परिसरातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय साहित्य म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी परिक्षा पॅडचे वाटप करण्यात येणार असून याचे ऊध्दाघाटन सोहळा माजी खासदार चिखलीकर व प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून लवकरच ग्रामीण व शहरी भागात वाटप करण्यात येणार आहे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा शक्ती मित्र मंडळाचे गजु कत्ते, गोपीचंद पप्पूलवाड, संतोष गुट्टे, शिवानंद वानखेडे, कैलास हंबर्डे, शामराव हंबर्डे, अनिल मोरे, श्रीनिवास हुसेकर,संतोष मुसळे, शिवा सुयंर्वशी, मंगेश कदम, बळी पाटील, योगेश सोमाणी व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
