नांदेड| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, एक्सिस बँक फाउंडेशन व भारत रुरल लाईव्हलिहूड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या अध्यक्षतेखाली High Impact Mega Watershed प्रकल्पासंदर्भात समन्वय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप कुलकर्णी, रोहयो उप मुख्यकार्यकारी अधिकारी अमित राठोड तसेच कृषी, सिंचन, वनपरीक्षेत्र, सामाजिक वनविभाग, जल व मृद संधारण, सिंचन, रेशीम पशुसंवर्धन आदी विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.

या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, मुखेड, किनवट व हदगाव या सहा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश रोहयो अंतर्गत भूपृष्ठावरील सिंचन सुधारणे, भूजल पुनर्भरण वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे असून गाव पातळीवर रोहयोची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध विभागामार्फत योजना राबविल्या जातात.

या योजनांचा लाभ घेण्याबाबत भारत रुरल लाईव्हलिहूड फाउंडेशनच्या माध्यमातून WOTR संस्था नांदेड, लोहा, AGVSS संस्था कंधार, मुखेड आणि RAES संस्था किनवट व हदगाव या संस्थेच्या मार्फत सहा तालुक्यातील गावांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे, असे BRLF चे राज्य समन्वयक सुनील सहारे यांनी सांगितले. तसेच या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागीय समन्वयक अभिलाष पटेल, क्षमता बांधणी तज्ज्ञ अरविंद कुमार उईके यांनी सहकार्य केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version