नांदेड| नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात अवकाळी पावस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशनुसार जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात आले. 

जिल्ह्यात दि.27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या पावसासोबत काही ठिकाणी गारपीट झाली.*यात फळबाग,फुलबाग,केळी,हळद, ऊस,चिकू,पपई व अन्य पिकाचे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा हवालदिल झाला आहे. वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याबाबत संबंधितांस सूचित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास उपकृत करावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली.

यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर,वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मीनल पाटील खतगावकर,माजी सभापती किशोर स्वामी,महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.रेखाताई चव्हाण,अ.जा.जिल्हाध्यक्ष मनोहर पवार,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, लोह्याचेतालुकाध्यक्ष शरदपवार,कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे,सुभाष पाटील दापकेकर,नवल पोकर्णा,बालाजी गव्हाणे,विक्की राऊतखेडकर,हदगाव तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष किशोर पाटील रुईकर,हदगाव काँग्रेस कमीटीचे माजी तालुकाध्यक्ष आनंदरावभंडारे शिवाजीराव पवार,अमोल डोंगरे,बालाजी कदम,राजू शेट्टे,दत्तात्रय सूर्यवंशी,बालाजी बद्देवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version