मुंबई| महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची असलेली परकीय नावे बदलून त्यांना स्वदेशी नावे देण्याच्या सुत्य निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो ! अशाच प्रकारे परकीय आक्रमकांच्या खुणा असलेली नावे अनेक रेल्वे स्थानके, रस्ते, शहर, तालुके, गावे, उद्याने यांना देण्यात आलेली आहेत. ती परकीय नावेही वरीलप्रमाणे बदलण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

गेली अनेक वर्षे हिंदु जनजागृती समिती ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ (सध्याचे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’), ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलने’ आदी विविध माध्यमांतून परकीय तथा परकीय आक्रमकांची नावे बदलण्याची मागणी सातत्याने करत आहेत. गेल्या एक हजार वर्षांच्या काळात भारतावर मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आदी अनेक परकिय आक्रमकांनी साम्राज्यविस्तारार्थ आक्रमणे केली. भारतातील अनेक नगरे, वास्तू यांना दिलेली नावे बदलण्यात आली.

७५ वर्षांपूर्वी भारत हे राष्ट्र म्हणून स्वतंत्र झाले; पण पारतंत्र्याच्या या खुणा (जखमा) नगरे, वास्तू, संग्राहलये, रस्ते आदींच्या नावांमधून आजही कायम आहेत. ज्या परकीय आक्रमकांना आम्ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्यांची नावे भारतात का द्यावीत? ज्या आक्रमकांनी भारतियांवर अनन्वित अत्याचार केले, त्यांचे उदात्तीकरण का म्हणून करायचे? या गुलामगिरीच्या खुणा अभिमानाने मिरवणे योग्य नाही. परकीय अथवा भारतीय संस्कृतीशी मिळती जुळती नावे नसल्यामुळे समाजाच्या सांस्कृतिक जीवनविषयक संकल्पनाही बदलतात. तसेच भावी पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची, संस्कृतीची आणि शौर्याची जाणीव होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वदेशी आणि भारतीय संस्कृतीशी मिळती-जुळती नावे देणे आवश्यक आहे.

राज्य सरकारने या आठ रेल्वे स्थानके, तसेच नगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. तसेच ही परकीय नावे केवळ रेल्वे स्थानकाला नसून ती स्थानिक रस्ते, उद्याने, अन्य ठिकाणांनाही देण्यात आलेली आहे. तेथेही नावेही बदलण्यात यावीत. त्याबरोबर ‘चर्चगेट’, ‘सांताक्रुझ’, ‘सीवूडस्-दारावे’ आदी अनेक रेल्वे स्थानकांसह दौलताबाद, औरंगपुरा, इस्लामपूर, तसेच टीपू सुलतान अशी अनेक नावे ही तालुके, गाव, शहरे, रस्ते, उद्यान, चौक आदींना दिलेली आहेत. ती सर्व नावेही बदलण्याची प्रक्रिया शासनाने करावी !

 

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version