![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240128-WA0024.jpg)
नवीन नांदेड। सिडको परिसरा लगत असलेल्या ऊस्मानगर रोडवरील धर्मवीर दिघे चौकात दिनांक २७ जानेवारी रोजी आनंद दिघे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या वेळी अन्नदान वाटप करण्यात आले.
धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्ट च्या वतीने आयोजित जयंती सोहळ्यास शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांनी चौकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून,आनंद दिघे स्मृती उद्यान नामफलकाचे उदघाटन/अनावरण केले स्व.धर्मवीर आनंद दिघे कार्याचा गौरव करून त्यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर्श जतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. शिवसेना नांदेड शहर प्रमुख,तुळजेश यादव, भाजपा नांदेड शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, कल्याण दरेगावे, धर्मवीर दिघे ट्रस्ट,अध्यक्ष यांची समयोचीत भाषने झाली .
जयंती सोहळ्यास उपस्थित असलेले तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, गंगाधर बडूरे,संपर्क प्रमुख,चंद्रपुर, सुहास खराणे,सिडको शहरप्रमुख ,यांच्या सह मान्यवर उपस्थित होते ,सूत्रसंचलन, दशरथ कंधारे शहर संघटक सिडको यांनी तर स्वागत आयोजक कल्याण दरेगावे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभर मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन कुळकर्णी रातोलिकर, राजू कोंडलेवाड, यशवंत पदरे,माधव भोंग,दीनानाथ दरेगावे,गजानन चालिकवार राजकुमार ठाकूरपपू पाटिल पतलावे,गुरुनाथ दरेगावे,अमरनाथ दरेगावे यांच्या सह युवकांनी परिश्रम घेतले.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)