
नवीन नांदेड| जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सिडको परिसरातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या पारंपरिक पद्धतीने शालश्रीफळ टोपी घालून व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला.
१५ आक्टोबर रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिवगंत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त व जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता जिल्हा सलंगन्न सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटना शाखा सिडको टिन शेड येथे नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, अध्यक्ष किरण देशमुख,पत्रकार दि. गा. पाटील व मान्यवरांच्या उपस्थित दिवगंत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या फोटोला प्रारंभी पुष्पहार अर्पण करण्यात आला, यानंतर जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार, मदनसिंह चौहाण, दौलतराव कदम, शेख सयोधदीन, किरण देशमुख,एकनाथ श्रंगारे, महिला वितरक वंदना लोणे, यांच्या पारंपारिक पद्धतीने टोपी, शाल, व हार देऊन संघटनेच्या वतीने अध्यक्ष सतिश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे व पदाधिकारी यांनी केला.
तर यावेळी जागतिक वृत्तपत्र दिनानिमित्त वृतपत्र विक्रेते यांच्या सायकल सजावट करून वृत्तपत्र विक्रेता यांच्या टोपी, हार व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला, यावेळी राम धांवडे,शुभम, गणेश ठाकूर, गणेश कांबळे, तातेराव वाघमारे, ओम नांदेडकर, राजु चोहाण,बालाजी दमकोडंवार, साई गोटमवार यांच्या ही सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील ग्राहकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. हा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त जणू वृत्तपत्र विक्रेता यांच्या कौटुंबिक सोहळा झाला होता.
