साहिबजादे यांच्या बलिदानास (शहादत) ला समर्पित विशेष सर्वधर्म सम्मेलनाचे नांदेडमध्ये आयोजन
नांदेड। गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड तर्फे, आदरणिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्ती मध्ये, डॉ. विजय सतबीर सिंघजी प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांचे साहिबजादे यांच्या बलिदानास (शहादत) ला समर्पित विशेष सर्वधर्म सम्मेलनाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
साहिबजादे त्यांच्या शहादत (बलिदानास) समर्पित गुरुद्वारा सचखंड बोर्डा तर्फे दि. 25 आणि 26 डिसेंबर 2023 रोजी “विशेष समागम” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये दि. 26 डिसेंबर 2023 रोजी ‘सर्व धर्म सम्मेलनचे’ आयोजन ‘श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन’ ए.सी. मध्ये दुपारी 12:15 पासून आयोजित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये विविध धर्माचे धर्मगुरु, प्रमुख व्यक्ती आपले मनोगत व्यक्त करुन श्रध्दा भेट करतील. तरी सर्वांना विनंती आहे कि, श्री गुरु ग्रंथ साहिब जी ए.सी. हॉल मध्ये आयोजित या सर्व धर्म सम्मेलनामध्ये उपस्थित राहून आपली श्रध्दा भेट करावी असे आवाहन ठाण सिंघ बंगई अधिक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड यांनी केले आहे.