आरक्षणाच्या लढाईत मी मराठा समाजा सोबत – खासदार हेमंत पाटील

नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. या विषयी माझ्या मनात कुठली ही शंका नाही. म्हणून मी लोकसभा आणि राज्यसभेतील माझे सहकारी खासदारांची दिल्लीत एकत्र बैठक घेतली. या बैठकीत इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिले गेले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले. सकल मराठा समाजास आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मी आरक्षणाच्या लढाईत आपल्या सर्वांच्या सोबत असेल असे वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी येथे केले.
हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी (दि.२६) भेट दिली. दरम्यान साखळी उपोषण स्थळी जाऊन मराठा समाजातील बांधवांच्या समस्या एैकुन घेत, मराठा आरक्षणासाठी आपण करत असलेले प्रयत्न, दिल्लीत सर्वपक्षीय खासदार महोदयांची घेतलेली बैठक याविषयी उपस्थित समाज बांधवांना माहिती दिली व आरक्षण आपल्या हक्काचे आहे. ते आज ना उद्या मिळेलच परंतू मराठा समाजातील तरुणाईने घाई गडबडीत कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये.
त्या पूर्वी आपले आईवडील, पत्नी आणि मुलांकडे एकदा वळुन बघावे. जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबियांकडे बघाल तेव्हा तुमच्या मनाला आत्महत्ये सारखा कुठलाही वाईट विचार येणार नाही. असा मोलाचा सल्ला देखील खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजातील युवकांना दिला आणि आरक्षण मिळविण्यासाठी उभारलेल्या या लढ्यात मी नेहमीच आपल्या सर्वांच्या सोबत असेल पुढे असेल असे सांगितले.
मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये सारख्या अतिशय उमद्या तरुणाने गळ्याला दोर लावून जीवन संपवले. ही अतिशय वेदना दाई आणि दुखःद घटना आहे. तरुणांनी इतकी हातघाई करु नये. असा सल्ला देखील त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, मा. जि.प.स. संभाराव लांडगे, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर, युवा सेना तालुकाप्रमुख बाळा पाटील पतंगे, दिगांबर शिरफुले, अंकुश शिरफुले, प्रशांत शिरफुले, प्रमोद शिरफुले (मोदी), बालाजी शिरफुले, दिनेश शिंदे, गोलू पाटील शिरफुले, अशोक शिरफुले यांचेसह सकल मराठा समाज बांधव, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये यांच्या घरी सांत्वनपर भेट
साखळी उपोषणा दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नैराश्य पोटी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदर्शन देवराये यांचे वडील ज्ञानेश्वर देवराये यांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. कुठली ही समस्या अडचन असल्यास कळवा मी आपल्या मदतीस तत्पर असेल असा शब्द दिला. नातवांना चांगले शिक्षण देण्याची विनंती केली.
