वाई बाजारच्या साई भक्तांची ४४० किलोमीटर पदयात्रा… १४ दिवसात गाठला श्रीक्षेत्र शिर्डी दरबार

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। साई दरबारी भक्ताची वारी, उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत माहूर तालुक्यातील साई भक्तांनी वाई बाजार येथून श्रीक्षेत्र माहूरगडच्या आई रेणुका मातेचे दर्शन घेवून शिर्डी अशी पदयात्रेला १ जून रोजी पासून सुरुवात केली होती.१४ जून रोजी साईबाबाचे दर्शन घेऊन समाप्ती झाली. तब्बल १४ दिवस वाई बाजार व परिसरातील साईभक्तांनी पायी चालून ही यात्रा पूर्ण केली.
पद यात्रेतील भाविक यात्रेकरूची ठिकठिकाणी साई भक्ताकडून चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती,साई भक्तांच्या या यात्रेने १४ दिवसात ४५० कि. मी. चा लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण केला. या यात्रेचे व्यवस्थापन व नियोजन वाई बाजार येथील युवा उद्योजक नितीन पाटील कन्नलवार यांनी केले होते.
स्वतः यात्रेमध्ये सहभागी नितीन कन्नलवार, राजू मुरगुलवार, राजू कन्नलवार, आकाश सातव, संतोष सोनटक्के, सचिन पडलवार, नरेश, राजू शिंदे, कपिल राऊत, राजू शेख, जुगणू व मनोज यांचा समावेश होता.या यात्रे दरम्यान माजी जि. प. उपाध्यक्ष समाधान आधव, दत्तराव मोहिते, विनोद राठोड यांनी वाशिम येथे तर युवा सेना जिल्हाप्रमुख यश खराटे यांनी लागूर आणि शेवटच्या दिवशी शिर्डी येथे बाळू मुरगुलवार, मनोज पाटील कन्नलवार, सतीश पवार, विष्णू पडलवार, संजय रेकुलवार यांनी सदिच्छा भेट घेतली. १४ दिवस श्रद्धापूर्वक पायी पदयात्रा करून भक्तिभावाने साई बाबांचे दर्शन घेऊन ही भाविक मंडळी घरी परतली आहे.
खूप उष्ण वातावरण आणि अपुरी विश्रांती यामुळे आम्हाला रोज खूप थकवा येऊ लागला, विशेषत: मान्सून धडकल्याने मधातच यात्रा थांबवावी लागेल अशी भीती सुद्धा मनातच होती,परंतु साईबाबा कृपेने कुठल्याही नैसर्गिक संकटा शिवाय आमची यात्रा आनंददायी ठरली.१४ दिवस पायी चालून शिर्डी दरबारी हजेरी लावण्याचा आनंद काही औरच होता. नितीन पाटील कन्नलवार,, उद्योजक,वाई बाजार.
