1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण श्री दत्तयाग व श्री लक्ष्मीयाग सप्ताहाचे पुणे येथे आयोजन
पुणे| येथे गुरुतत्व प्रदिप, पुणे या पारमार्थिक कार्य करणार्या परिवाराच्या वतीने (कथाकारः प.पु. श्री मकरंद महाराज, पिठाधिपती, श्री क्षेत्र दत्तधाम, परभणी) यांच्या 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण श्री दत्तयाग व श्री लक्ष्मीयाग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचपदी रा. 8 ते 9, जन्मोत्सव, दीपोत्सव, पुष्पोत्सव इ. विविध धार्मिक कार्यक्रम आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमात दत्तमहाराजांना स. 8 ते 10 या वेळेत राजोपचार लघुरुद्र अभिषेक व संगीत सभा, ग्रंथराज श्री गुरुचरित्र सारामृत पारायण स. 10 ते 12, श्री दत्तयाग व श्री लक्ष्मीयाग स. 10 ते 12 व दु. 2 ते 4, भिक्षा नैवेदय व आरती दु. 12 ते 12.30, माध्यान्न प्रसाद दु. 12.30 ते 3, संगीत श्री गुरुचरित्र कथामृत दु.3 ते 6.30, (कथाकारः प.पु. श्री मकरंद महाराज, पिठाधिपती, श्री क्षेत्र दत्तधाम, परभणी), पंचपदी रा. 8 ते 9, जन्मोत्सव, दीपोत्सव, पुष्पोत्सव इ. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. 13/01/2024 ते दि. 20/01/2024 या कालावधीत राधाकृष्ण गार्डन्स, कात्रज हायवे, धनकवडी येथे हा सप्ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अंदाजे 1600 वाचक पारायणास बसणार आहेत. या कार्यक्रमाची सांगता ग्रंथ दिंडी व महाप्रसादाने होईल. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहुन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा. असे या कार्यक्रमाच्या संयोजकांनी कळविले आहे.