धर्म-अध्यात्मनांदेड

बालाजी मंदीर हडको व सिडको येथे बालाजी लक्ष्मी पद्मवती सोहळा उत्साहात

नवीन नांदेड। दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने आष्टमीचा दिवशी सायंकाळी हडको व सिडको येथील बालाजी मंदिरात पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलष्टके, वांजत्री, फटाक्यांची आतिषबाजीत हा विवाह सोहळा भाविक भक्तांचा उपस्थित संपन्न झाला.

हडको येथील बालाजी मंदिरात २१ वा दसरा ब्रम्होत्सव,तर सिडको येथे बालाजी मंदिरात ३३ वा ब्रम्होत्सव आयोजित करण्यात आला होता, दरम्यान २२ आक्टोबर रोजी आष्टमीचा दिवशी बालाजी लक्ष्मी पद्मवती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, ब्रम्होत्सव निमित्ताने दैनंदिन व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. विवाह सोहळा पुरोहित सतिश गुरू,दुबे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान जयंती श्रीकांत पल्ली यांच्या उपस्थितीत बालाजी लक्ष्मी पद्मवती विवाह सोहळा लग्न आष्टके,वांजत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा विवाह सोहळा पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी सिडको हडको परिसरासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी साठी मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बालकृष्ण येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख ,संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख, चंद्रशेखर चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

सिडको येथील श्री.भगवान बालाजी मंदिरात पुरोहित वटीकोटा रामानुजाचार्य,पवनकुमार आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान यांच्या उपस्थितीत भगवान बालाजी लक्ष्मी पद्मवती विवाह सोहळा संपन्न झाला,यावेळी मंगल अष्टके झाल्यानंतर वाजंत्री, फटाक्यांच्यी आतषबाजी करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला. हा सोहळा यशस्वीतेसाठी विश्वस्त अध्यक्ष साहेबराव जाधव, सचिव व्यंकटराव हाडोळे,बाबुराव बिरादार कोषाध्यक्ष बाबुराव बिरादार,तुकाराम नांदेडकर, आंनद बासटवार,डॉ.नरेश रायेवार,वैजनाथ मोरलवार,पुरूषोतम जवादवार,रामचंद्र कोटलवार,गोविंद सुनकेवांर, पुंडलिक बिरादार व ऊत्सव समितीने यांनी परिश्रम घेतले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!