दिलीप देविदासराव सांगवीकर यांचे अपघाती निधन

लोहा। वडेपुरी ता, लोहा येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व- शैक्षणिक, सामाजिक राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रात तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवेच्या माध्यमातून वडेपुरीच्या सर्वांगीण विकासात सहभागी असणारे श्री दिलीप देविदासराव सांगवीकर यांचे आज अपघाती निधन झाले.
वडेपुरी आणि पंचक्रोशीत अतिशय सन्मानाने त्यांचे नाव घेतले जाते. सामाजिक तसेच शैक्षणिक योगदान त्यांचे आहे. त्यासोबतच ते वैद्यकीय क्षेत्रात एका औषध उत्पादक कंपनीमध्ये कार्यरत होते. त्याही माध्यमातून त्यांनी अतिशय मोलाचे कार्य केलेले आहे. पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते तसेच वडेपुरी आणि परिसरातील समाज उपयोगी विविध उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे.
अतिशय शांत- संयमी आणि तरुणाचे श्रद्धास्थान म्हणून ते वडेपुरी मध्ये प्रसिद्ध होते. त्यांचे असे अपघाती जाणे म्हणजे सर्वांसाठी एक दुःखाचे ओझे झाले आहे, असे सर्व गावकऱ्यांच्या वतीने प्रतिक्रिया आहे.
दिवंगत श्री दिलीप सांगवीकर यांच्या पार्थिव देहावर गुरुवार दि 13 जून 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता वडेपुरी येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वडेपुरीकर आणि परिसरातील सर्व सांगवीकर प्रेमींची भावपूर्ण जड अंतकरणाने श्रद्धांजली.
