करियरनांदेड

कोठ्यात पालक संतप्त; शिक्षक देता येत नसतील तर पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत द्या

हिमायतनगर,अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी काठारील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज दि.१८ रोजी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणा व भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे. जोपर्यंत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही… जर शिक्षक देता येत नसतील तर आमच्या पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत द्या असा पवित्र घेतला आहे.

हिमायतनगर तालुका शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. शिक्षणाचा पाया असलेल्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला असून, यास कारणीभूत शिक्षणाच्या रिक्त जागा आहेत. याचाच प्रत्यय हिमायतनगर तालुक्यातील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर आला असून, महिन्यापासून शिक्षक देऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा अशी मागणी गावातील शिक्षणप्रेमी महिला पुरुष पालक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम रमेश आडे यांनी हिमायतनगर येथील गटशिक्षण कार्यालयाकडे केली. मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्राची शाळा सुरू झाली असताना येथील जिल्हा परिषद शाळेवर एकही शिक्षक आला नाही. या ठिकाणी इयत्ता पहिली पासून ते पाचवी पर्यंतची शाळा चालविले जाते. आजघडीला या सहलीत एकुण विद्यार्थी संख्या 80 असून, त्यामध्ये वाढ होण्यांची शक्यता आहे. पुर्वी शाळेवर जे शिक्षक होते त्यांच्या बदल्या झाल्याचे पालकांना कळाले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे दिनांक 15 जुन 2024 रोजी सुरु झालेली आहे. शाळा सुरु झाल्यानंतर फक्त एक शिक्षक हजर होवुन शाळा बघुन निघुन गेला. त्यानंतर शाळा उघडलेली नाही त्यामुळे आज दिनांक 18.06.2024 रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावांतील पालक व नागरीक शाळेवर उपस्थित झाले व कोणता तरी शिक्षक येईल म्हणुन शाळेवर 11.30 वाजेपर्यंत वाट पाहिली. परंतु शाळेवर एकही शिक्षक हजर झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व शिक्षण प्रेमी पालकांनी जिल्हा परिषद शाळेला  कुलूप लावून शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे

ग्रामीण भातातील शिक्षणाची हि दुरावस्था दूर करून शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्वरीत शाळेवर विद्यार्थी संख्या बघुन शिक्षकांची त्वरीत नेमणुक करुन शाळा पुर्ववृत्त सुरु करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्वरीत शाळेवर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक हजर न झाल्यास आमच्या पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत देण्यांत याव्यात असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जर उद्या दिनांक 19.06.2024 पासुन शाळेवर शिक्षक हजर न झाल्यास आमच्या पाल्यांच्या शैक्षणिक नुकसानीस हिमायतनगर येथील शिक्षण विभाग जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी असा इशाराही कुलूप लावणाऱ्या पालकांनी दिला आहे.

या शाळेवर अजून तरी कायम शिक्षकाची नेमणूक नाही. पहिल्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात एका शिक्षकाची नेमणूक केली होती. त्या दिवशी ते शाळेलाही भेट देऊन आले. मध्ये दोन दिवस शाळेला सुट्टी असल्यामुळे ते परस्पर रजेवर गेले. त्यांना तर कारणे दाखवा नोटीस बजावूच पण, शाळेत शिक्षक नसल्याची माहिती अगोदर आमच्या प्रशासनालाही नव्हती. माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी आम्ही इतर शाळेवरून तातडीने दुसऱ्या एका शिक्षकाला शाळेवर जाण्यास सांगितले. पण तोही थोडा उशिरा पोहोचला. त्यालाही गावकऱ्यांनी शाळा उघडू दिली नाही. सध्या हिमायतनगर तालुक्यात १२० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत आम्ही आमच्या अखत्यारीत फक्त तात्पुरत नियोजन लावत आहोत. बाकी कायमस्वरूपी शिक्षक नेमण्याचे अधिकार वरिष्ठांना आहेत. अशी प्रतिक्रिया हिमायतनगर गटशिक्षण विभागाचे गट समन्वयक अरुण पाटील यांनी दिली.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!