महोमद जफरोद्दिन यांची उर्स समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
कंधार, सचिन मोरे। कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम यांच्या ७०९ व्या उर्सा निमित्त स्थापन करण्यात आलेल्या उर्स समितीच्या अध्यक्षपदी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष महोमद जफरोद्दिन बाहोद्दिन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दर्गाचे सज्जादा सयद शाह मुर्तुजा मोहियोद्दिन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आलेली ऊर्स समिती पुढील प्रमाणे : अध्यक्षपदी महोमद जफरोद्दिन, उपाध्यक्ष सयद मझरआली, सचिव समीर चाऊस, सह सचिव मिर्झा अथर बेग, कोषाध्यक्ष सयद अमजद इनामदार तर सदस्य म्हणून माजी सरपंच शेख फारुक, माजी नगरसेवक अडुल सेठ, शेख मन्नू, सयद अहमद अली,
शेख रब्बानी, मोहमद जफर,अल फारुक, अड. कलीम अन्सारी, मुहममद खैसरोद्दिन, मुश्ताक हाश्मी, सयद सलीम, खदिर कुरेशी, गुलाम रसूल, शेख जाविद, शेख नवाज, खालेद कुरेशी, शेख अजीम यांची निवड करण्यात आली. दर्गा समितीवर शेर महोमद, हमीदोद्दिन मोलीसाब, मिर्झा सिकंदर बेग, शब्बीर खान, चुन्नू मास्टर, हाजी मोईन, शेख अल्लाउद्दीन चौधरी यांची निवड करण्यात आल्याचे जफरोद्दिन यांच्याकडून जाहीर करण्यात आले.