नवीन नांदेडl सराफा असोसिएशन सिडकोने केलेल्या मागणी नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ सराफा बाजार दुकानाच्या संरक्षणासाठी दोन पोलीस कार्यरत असलेली राहुटी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज मुख्य रस्त्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सराफा बाजार लगत मुख्य रोडवर दोन पोलीस तैनात असलेली राहुटी टाकण्यात आली आहे.
सिडको परिसरात असलेल्या सराफा बाजार मधील आज पर्यंत तिन दुकान दाराची सोने चांदी ऐवज असलेली पिशवी बॅग लंपास केल्यानंतर व्यापारी बांधवामध्ये दहशत पसरली होती,या प्रकरणी अध्यक्ष गिरीधर मैड व सचिव अतुल धानोरकर,माजी अध्यक्ष राजेंद्र कुलथे,प्रभाकर डहाळे, दिपक कुमार धानोरकर, सतिश लोलगे, प्रमोद टेहरे,गुरुप्रसाद डहाळे, प्रशांत डहाळे, श्रीपाद डहाळे, गोपाळ बोकान,गोपाळ वाकडे, धरम कडपेवाले, राजु पांचाळ, प्रदीप टाक, यांच्या सह ४० दुकानदारांनी व भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख,महानगर भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांनी घटनास्थळी पाहणी साठी आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यी भेट घेऊन सराफा असोसिएशन असलेल्या दुकाने यांना पोलीस बंदोबस्त देऊन सराफा बाजार मध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा व झालेल्या चोरी घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा सिडको सराफा असोसिएशन मार्फत सिडको भागातील सराफा दुकाने व सिडको व्यापार बंद ठेवण्याचा ईशारा दिला होता.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ सराफा बाजार भागात राहुटी व पोलीस बंदोबस्त देण्यात येऊन संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, अखेर २५ नोव्हेंबर पासून ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही राहुटी टाकण्यात आल्यानंतर दोन पोलीस कार्यान्वित करण्यात आले आहे.