नांदेड| मागील बारा वर्षापासून पतंजली योगपीठ परिवार नांदेड तर्फे रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याचा पार्श्वभूमीवर भाऊबीजेच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
नांदेड शहराटी भाऊबीज रोजी अनिल अमृतवार, शिवाजीराव शिंदे हळदेकर, दिगंबर पाटील, जगन्नाथ येलवाड, प्रल्हाद पेंटेवाड, देविदास लाटकर, सुधाकर चरकुला, वसंतराव कल्याणकर आदींनी चिखरवाडी, गुरुद्वारा रोड, शनी मंदिर, मोंढा टावर, बालाजी मंदिर, महावीर चौक, बस स्टँड, रेल्वे स्टेशन असे फिरून 165 जणांना फराळाचे साहित्य वाटप केले.
या फळाच्या साहित्यासाठी सर्वश्री व्यंकटेश कवटेकवार पुणे, पंढरीनाथ कंठेवाड, नंदिनीताई चौधरी, सुरेखाताई घोगरे, अनिल अमृतवार, शिवाजीराव शिंदे हळदेकर, जगन्नाथ येईलवाड, देवीदास लाटकर, वसंतराव कल्याणकर, अनिल कामिनवार, सोपानराव मारकवाड, श्रीराम मोरे, राजू सातोनकर, श्रीकृष्ण मंदिर योगसादक, भक्ती लॉन योगसादक, गीता नगर योगसादक, वामन नगर योगसादक, अशोक नगर योगसादक आदींनी आर्थिक मदत व फराळाचे साहित्य दिले असे अनिल अमृतार यांनी सांगितले.