नांदेड। मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटिल हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाचा आरक्षणासाठी दि 02 रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढला जाणार आहे.
आंदोलनाचा दुसरा टप्पा चालु झाला असून यात गाव बंदी मतदान वर बहिष्कार व मराठा आरक्षणासाठी जनजागृती पर कॅन्डल मार्च चे आयोजन करण्याचे आदेश मनोज जरांगे पाटिल यांनी दिले असून, त्याच धर्तीवर नांदेड येथे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा (आयटीआय चौक)ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कॅण्डल मार्च चे आयोजन सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने केले आहे.
नांदेडमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या या आंदोलनाचा एक भाग असलेल्या कॅन्डल मार्च रॅलीस सर्व समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हवे अस आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.