नांदेड। गेल्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवेदन देऊन नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अर्धापूर, भोकर , नांदेड , नायगाव आदी भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांना फटका बसला . तर याचवेळी फुल शेती आणि भाजीपाला शेतीला आहे तडाका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे . अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे काही घरांची पडझड झाली आहे.
त्यामुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीची तातडीने पंचनामे करावेत शेतकऱ्यांना आणि संबंधित नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज केली आहे . या मागणीची निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठवले आहेत.