बालाजी मंदीर हडको व सिडको येथे विजया दशमी दसरा निमित्ताने भाविक भक्तांनी घेतले दर्शन
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231025-WA0019.jpg)
नवीन नांदेड| विजया दशमी दसरा निमित्ताने सकाळपासूनच हडको येथील बालाजी मंदिरात व सिडको भगवान बालाजी मंदिर येथे भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनसाठी गर्दी केली होती तर ब्रम्होत्सव निमित्ताने होम हवन यासह धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते, यावेळी गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हडको येथील बालाजी मंदिरात २१ वा दसरा ब्रम्होत्सव,तर सिडको येथे बालाजी मंदिरात ३३ वा ब्रम्होत्सव १५ ते २४ आक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता, यावेळी दैनंदिन कार्यक्रमासह होम हवन,वंसत उत्सव,बालाजी पदमवाती लक्ष्मी सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन पुरोहित सतिश गुरू,दुबे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली क्ष आयोजित करण्यात आला होता,तर ब्रम्होत्सव सोहळा यशस्वी साठी मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बालकृष्ण येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख ,संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख, चंद्रशेखर चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
सिडको येथील श्री.भगवान बालाजी मंदिरात पुरोहित वटीकोटा रामानुजाचार्य,पवनकुमार आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यासु महाराज यांच्या आचार्य तत्वाने ब्रम्होत्सव मधील विविध धार्मिक व दैनंदिन संपन्न झाले. ब्रम्होत्सव सोहळा यशस्वीतेसाठी विश्वस्त अध्यक्ष साहेबराव जाधव, सचिव व्यंकटराव हाडोळे,बाबुराव बिरादार कोषाध्यक्ष बाबुराव बिरादार,तुकाराम नांदेडकर, आंनद बासटवार,डॉ.नरेश रायेवार,वैजनाथ मोरलवार,पुरूषोतम जवादवार,रामचंद्र कोटलवार,गोविंद सुनकेवांर,पुंडलिक बिरादार व ऊत्सव समितीने यांनी परिश्रम घेतले. विजयादशमी दसरा निमित्ताने दोन्ही मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी भाविकांनी व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)