करियरनांदेड

“भूमी,जन व संस्कृतीची सेवा म्हणजेच राष्ट्राची सेवा होय” – प्रा. रामकृष्ण बदने

हिमायतनगर| कुठल्याही राष्ट्राचे स्वरूप हे तीन तत्त्वावरती अवलंबून असते. ज्यामध्ये भूमी लोक व संस्कृती हे महत्त्वाचे आहे. या तिन्हींची सेवा करणे म्हणजेच राष्ट्राची सेवा करणे होय. आणि हेच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये अभिप्रेत आहे.भूमी आपणास पाणी देते, वृक्ष व अन्य सर्व प्रकारचे अन्नधान्य देते. त्या भूमी बद्दलची कृतज्ञता आपल्या अंतकरणात आपण बाळगली पाहिजे.

अनेक महापुरुषांनी आपल्या भूमीबद्दलची कृतज्ञता बाळगली म्हणूनच ते महापुरुष होऊ शकले.भूमी बध्दलची कृतघ्नता हे चुकीचे असून आजच्या युवकांनी आपल्या मातृभूमीबद्दल आणि मातेबद्दल अंतकरणांमध्ये निष्ठा बाळगली पाहिजे.स्वामी विवेकानंद,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे सगळी गुणवत्ता असताना देखील राष्ट्राबध्दल प्रेम बाळगले.हीच भूमिका आपण आपल्या मातृभूमीबद्दल घेतली पाहिजे.आपण आपल्या मातृभूमी इतकेच आपल्या मातेवर देखील प्रेम केले पाहिजे.अलीकडच्या काळात आपण आई-वडिलांना विसरत चाललो आहोत. ते बाजूला करून आई-वडिलांच्या बद्दल आपण आपल्या अंतकरणांमध्ये प्रेम बाळगा. भूमी,जन व संस्कृती याबद्दलची सेवा म्हणजे राष्ट्राची सेवा होय असे प्रतिपादन मुखेड येथील प्रसिद्ध वक्ते प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने यांनी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मंगरूळ येथे आयोजित केलेल्या विशेष युवक शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना व्यक्त केले. सदरील शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंचावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदरील शिबिराचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.शिवाजी भदरगे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिन्दी विभागाच्या प्रा. डॉ. शेख शहेनाज ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून मंगरूळ येथील सरपंच प्रतिनिधी बालाजी पावडे, उपसरपंच संतोष अंबेकर व नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे आदी होते. सदरील कार्यक्रमाचे आभार सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ.एल.बी.डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व तसेच कार्यालयीन कर्मचारी बंधू भगिनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
× How can I help you?