श्रीरामनगरात अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा
नांदेड| सर्व भाविक भक्तांना कळविण्यांत अत्यंत आनंद होतो की, प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री वसुंधरारत्न राष्ट्रसंत सदगुरु डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्तराधिकारी ष.ब्र.108 सदगुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (राजूरमठ) यांच्या कृपा आशिर्वादाने श्री रामेश्वर शिव मंदीर, श्रीराम नगर नांदेड येथे मिती माघ शु.10 शके 1945 दि.19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार पासून ते माघ कृ.2 दि. 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळयाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कृतार्थ व्हावे.
अखंड शिवनाम सप्ताहामध्ये श्री ष.ब्र.108 सदगुरु सांबशिवाचार्य महाराज व श्री ष.ब्र.108 सदगुरु दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री ष.ब्र.108 सदगुरु रुद्रमुनि शिवाचार्य महाराज मुदखेड, श्री ष.ब्र.108 शिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री ष.ब्र.108 सदगुरु करबसव शिवाचार्य महाराज लासिन मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (राजूरमठ) या गुरुवर्यांची उपस्थिती व अमृतउपदेश होणार आहेत. दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी पहाटे 5 ते 6 शिवपाठ, 6 ते 8 रुद्राभिषेक, 9 ते 11 परमरहस्य पारायण, 11 ते 12 प्रवचन, दुपारी 12 ते 3 प्रसाद, दुपारी 3 ते 4 मन्मथ गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 शिवपाठ, रात्री 8.30 ते शिवकिर्तन नंतर शिवजागर राहील.
सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.श्री कार्तिक स्वामी मारापल्ले, शिवकिर्तनकार शि.भ.प.सौ.संगीताताई परमेश्वर कार्लेकर, प्रसाददाते श्री माणिक विठ्ठलराव नरंगले, मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प. जल्लअप्पा कापसे गुरुजी लोण, शिवकिर्तनकार शि.भ.प.रमेश महाराज कस्तुरे दगडगाव, प्रसाददाते श्री बाबाराव पिराजी शिवशेट्टे, बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प. कैलाश नवले गुरुजी बामणी, शिवकिर्तनकार शि.भ.प.विकास महाराज भुरे मांजरम, प्रसाददाते श्री उमाकांत बाबुराव थोटे हनुमानगड, गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.सौ.राखी अतुल हुरणे मोरचौक, शिवकिर्तनकार शि.भ.प.स्वातीताई माधव तमशेट्टे राजादापका, प्रसाददाते श्री गजानन मनोहर सुपारे सगुना उडपी, शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.मानेजी सोमवारे मालेगाव,
शिवकिर्तनकार शि.भ.प.चंद्रकांत गुरुजी अमलापूरे गडगा, प्रसाददाते श्री माधव दिगंबर मंगनाळे, शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.शिवराज गोदरे स्वामी बारसगाव, शिवकिर्तनकार शि.भ.प.सौ.संगिताताई पाटील बेंद्रीकर, प्रसाददाते श्री रमाकांत बाबुराव थोटे, रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.श्री बोध्दाजी जैवंता पांडागळे शिराढोण यांचे टाळ आरतीवरील किर्तन दुपारी 3 ते 5, शिवकिर्तनकार शि.भ.प.शिवानंद महाराज दापशेडकर व शि.भ.प.सौ.सत्यभामाबाई येजगे मगनपुरा, प्रसाददाते श्री शिवराज व्यंकटराव इंद्रे, सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी शिवकिर्तनकार शि.भ.प.भिमाशंकर स्वामी कापसीकर यांचे सकाळी 11 ते दुपारी 2 प्रसादावरील किर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. श्री वसुंधरारत्न राष्ट्रसंत सदगुरु श्री ष.ब्र.108 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा 109 वा जन्मउत्सव दिनांक 25.02.2024 रोजी रविवारी दुपारी 12 वाजता श्री रामेश्वर शिवमंदीर श्रीरामनगर नांदेड येथे आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती.
विणेकरी अशोकराव दहिफळे, विठ्ठलराव भुरे, हार्मोनियम वादक नंदुअप्पा देवणे, मनोज पेंटर रुईकर, प्रल्हाद होळगे, बाबाराव शिराळे, विश्वांभर सावळे, मृदंगाचार्य मारोती स्वामी, हानमंत देशमुख कौठेकर, दामोदर गुरुजी, सोळंके दुर्गेश, अमोल लकडे, शंकर काळे, शिवप्रसाद कुराडे, गायक नंदुआप्पा देवणे, हानमंत पेंटर आंजणीकर, त्र्यंबक पावडे, लाठकर सुगाव, दिपक खटके, प्रल्हाद होळगे, महिला व पुरुष भजनी मंडळ मगनपुरा, पेनूर, सुगांव, लोणी बु, पांडुरंगनगर, खुरगाव, गौळीपुरा, बसवेश्वरनगर, सिडको, गुंज, बारसगाव, अक्का महादेवी भजनी मंडळ हाडको नांदेड.
या अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळयाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ व गुरुवर्यांचा अमृत उपदेश घेऊन आपले जिवन कृतार्थ करुन घ्यावे, असे आवाहन श्री रामेश्वर शिवमंदीर नवयुवक सदभक्ती मंडळ व समस्त श्रीरामनगर, हनुमानगड, नाथनगर सदभक्ती मंडळी व रामेश्वर शिव महिला व पुरुष भजनी मंडळ, रामेश्वर शिवमंदीर श्रीराम नगर नांदेड यांनी केले आहे.
