नांदेडमहाराष्ट्र

आगामी निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा – निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने 89 नायगाव विधानसभा मतदार संघातील 349 मतदार केंद्रावर नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये काही बदल करण्यात आला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि धर्माबाद येथील तहसीलदार वैभव महेंद्रकर, नायगावचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार येरावार, नायगाव निवडणूक अधिकारी संतोष कुलकर्णी, नायब तहसीलदार विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन स्वाती दाभाडे यांनी केले आहे.

नायगाव मतदार संघातील 349 मतदार केंद्रावर नवीन यादी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये काही प्रमाण बदल करण्यात आले असून विधानसभा मतदारसंघात 11802 नवीन मतदार नोंदणी दिनांक 5 जानेवारी 2023 पासून करण्यात आली तर सहा हजार नऊ महिला मतदाराची नव्याने नोंदणी करण्यात आली आणि 18 ते 19 वयोगटातील 4321 युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे मतदारसंघांमध्ये 2300 दिव्यांग मतदारांना मतदार यादी मध्ये मार्क करण्यात आले तर मतदार यादीतील एकूण 8816 मयत मतदार यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली असून मतदाराची दोन ठिकाणी नावे असलेल्या 529 मतदारांची नावे कमी करण्यात आले आहे.

तर1332 स्थलांतरित मतदारांची नावे कमी केलेली आहेत याबरोबर मतदार यादी मध्ये चुकीचा अथवा अस्पष्ट फोटो असलेल्या 2582 मतदारांचे नव्याने फोटो अपलोड करण्यात आले नायगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यात स्त्री 144389 आणि पुरुष 153834 व तृतीयपंथी 10 असे एकूण 298233 एवढी संख्या असून शंभर पुरुषामागे 933 महिला मतदाराचे प्रमाण होते ते वाढून 939 एवढे झालेली आहे विशेष म्हणजे अद्याप ज्या मतदारांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्व मतदारांनी तात्काळ आपले नाव नोंदवावे व ज्यांची नावे यापूर्वी मतदार यादी मध्ये होती यानी आपल्या गावातील बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादी मध्ये आहे का याची खातरजमा करून घेणे आणि आगामी निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले आहे. यावेळी अव्वल कारकून रोशन सिंग ग्रंथी, लिपीक अशोक भालेराव व कर्मचारी, सेवक यांची उपस्थिती होती.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!