नांदेडमहाराष्ट्र

हिमायतनगरात विजयादशमी निमित्त संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन

हिमायतनगर, परमेश्वर काळे| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर वाढोणा शहरातील श्री परमेश्वर मंदिरापासून सघोष पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वाढोणा येथे प्रमुख मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांना बौद्धिक मार्गदर्शन केले. यावेळी भोकर, किनवट, हिमायतनगर, हदगाव आदी ठिकाणाहून स्वयंसेवक उपस्थित झाले होते.

दि.२५ बुधवारी हिमायतनगर (वाढोणा) येथे सकाळी ८ वाजता येथील श्री परमेश्वर मंदिरात प्रथम वाद्याच्या गजरात रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर ध्वजवंदन प्रार्थनेननंतर विजयादशमी पथसंचालनाची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. शोभायात्रेत युवकांनी संघाचे गणवेश धारण करून हाती भगवा ध्वज व काठी घेऊन सघोष संचलन शिस्तबद्ध पद्धतीने केले. पथसंचालन शोभा यात्रा परत श्री परमेश्वर मंदिरात येताच स्वागत झाले.

त्यानंतर श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात मंदिरात भारत माता, डॉ हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी हिंगोली येथील जिल्हा संयोजक श्री विजय मोतीराम सिद्धेवार व इतर मान्यवरांनी उपस्थितांना बौद्धिक मार्गदर्शन केले. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करून हि शोभा यात्रा निर्विघ्न पार पडावी म्हणून बंदोबस्त ठेवला होता.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!