महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक २५ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार
नांदेड l मुख्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र दिनांक १२.०७.२०२४ अन्वये भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक २५ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) संदर्भात प्रचार प्रसिध्दी करणे बाबत निर्देश दिलेले आहेत.
या निर्देशानुसार नवमतदारांचे नाव नोंदणी, मतदारांच्या नाव/पत्त्यातील बदल, स्थलांतरीत मतदार, मयत मतदारांचे नाव वगळणी इत्यादीसांठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी साठी व दुरुस्तीसाठी www.voter.eci.gov.in हे संकेत स्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲपवरून ऑनलाईन प्रक्रीयेची सुविधा उपलब्ध आहे. तरी या कार्यक्रमाची महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी व नागरिकांनी नोंद घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.