
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, सर्व शैक्षणिक संकुले व नांदेड शहरातील राष्ट्रीय सेवा योजना राबविणाऱ्या महाविद्यालयामार्फत दि. ०१ ऑक्टोबर रोजी मा. प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘स्वच्छताही सेवा’ अंतर्गत एक तारीख एक तास स्वच्छतांजली श्रमदान हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना स्वच्छते बाबतची ‘स्वच्छता शपथ’ दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशाकीय इमारतीपासून सुरुवात कलेल्या स्वच्छता रॅलीचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. त्यानंतर विद्यापीठ परिसरामध्ये एक तारीख एक तास स्वच्छतांजली श्रमदान करण्यात आले.
‘स्वच्छताही सेवा’ या श्रमदानामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्र. कुलसचिव व्यंकट रामतीर्थे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्रा. डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. रमेश ढगे, डॉ. निना गोगटे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, नांदेड जिल्हा समन्वयक डॉ. अमोल काळे, माजी जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे, विभागीय समन्वयक डॉ. प्रविण मुळी, विभागीय समन्वयक डॉ. दिलीप काठोडे, विभागीय समन्वयक डॉ. यशवंत मोखेडे, विभागीय समन्वयक डॉ. सोमनाथ बिराजदार, कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय गुंजकर यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच ५०० विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग घेवून श्रमदान केले.
