हिमायतनगर। आई – बाळाची नऊ महिने आधीच नाळ जुळलेली असते म्हणुन आई जगात श्रेष्ठ आहे, मातृत्वाला सांभाळत मुलांच कोड कौतुक पहायला माता येथे उपस्थित आहेत त्या तुलनेत वडीलांची संख्या कमी आहे, पाल्यांचा विकास होण्यासाठी आई वडील दोघांनीही मुलांच संगोपन कोड कौतुक केले तर मुलांचा विकास योग्यरित्या घडतो. आई वडील, शाळा आणि समाज या तिघांच्याही संस्कारातून मुलांमधील सुजाण नागरीक घडत असतो असे प्रतिपादन गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांनी केले.त्या शहरातील गुरूकुल इंग्लीश स्कुल च्या उमंग २०२४ वार्षिंक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
व्यासपीठावर सचिव तथा कार्यवाह डॉ. मनोहर राठोड, माधुरी रेड्डी मॅडम, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, सं.गा.नि.यो. अध्यक्ष विजय वळसे, रामभाऊ सुर्यवंशी, अनिल माने, गजानन गोपेवाड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पाटील म्हणाल्या मुलगा किंवा मुलगी एकट्याचे नाहीत तर ते दोघांचेही आहेत, आई दिवसभर काम करून सायंकाळी मुलांच कौतुक पाहण्यासाठी शाळेतील कार्यक्रमास उपस्थित राहते, परंतु पित्यांनेसुद्धा सोबतयेणे गरजेचे आहे, आई वडील दोघांनीही मुलांच कोड कौतुक पहावे यातुन मुलांचा अष्टपैलु विकास होतो, येणाऱ्या काळात आई वडीलांनी मुलांकडे लक्ष द्यावे मुलाला शाळेत टाकुन जबाबदारी पुर्ण होत नाही, घरच्या आईंनी शाळेतल्या बाईं सारख, शाळेतल्या बाईंनी आई सारख वागल पाहिजे तेंव्हाच मुलगा सुजाण नागरीक घडतो असे म्हणत शाळेच्या व्यवस्थापन उपक्रमांची प्रशंसा करत कलाकार विद्यार्थ्यांना खासदार हेमंत पाटील यांचे कडुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, सं.गा.नि.यो. अध्यक्ष विजय वळसे, शाळेचे सचिव कार्यवाह मनोहर राठोड सर, माधुरी रेड्डी मॅडम, शिक्षक सर्व कर्मचारी वृंद, रामभाऊ सुर्यवंशी, गटप्रमुख गजानन गोपेवाड, रामदास भडंगे, अनिल माने, युवासेना ता. प्र. ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, गट प्रमुख नागोराव गुंडेवाड, संतोष शिरगिरे, सुनिल दमकोंडवार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माता पालकांची उपस्थिती होती.