क्राईमनांदेड

स्थानिक गुन्हे शाखेकडून 1,35,250/- रुपयाचा 27 किलो 50 ग्राम गांजा जप्त

नांदेड। पोलीस ठाणे उस्माननगर हद्दीमध्ये मौजे हाळदा ता. कंधार शिवारात एका शेतामध्ये एन डी पी एस कायद्याच्या तरतुदीचा भंग करून अंमली पदार्थ गांजाचे झाडाची लागवड करुन जोपासलेली आहेत अशी खात्रीशिर माहीती स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळाली. त्यांनी मिळालेली माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे पोलीस अमंलदार, महसुलचे राजपत्रीत अधिकारी यांना सोबत घेवुन दिनांक 08/04/2024 रोजी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी मोजे हाळदा ता. कंधार शिवारात गट नंबर 675 मधील शेतात ज्वाराचे पिकात एकुण 13 लहान मोठे गांजाचे झाडे ज्याचे वजन 8 किलो 700 ग्राम लागवड करुन जोपासलेली एकूण किंमती 43500/- रुपयाचे मिळुन आला

आरोपी नामे बजरंग नागोराव दुरपल्ले वय 40 वर्ष व्यवासाय शेती रा. हाळदा ता. कंधार याचेविरुध्द पोलीस ठाणे उस्माननगर येथे गुरनं. 56/2024 कलम 20(b)li (b) NDPS ACT प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नमुद शिवारातच गट के 636 मधील शेतात ज्वाराचे पिकात एकूण 34 लहान मोठे गांजाचे झाडे ज्याचे वजन 18 किलो 350 ग्राम लागवड करुन जोपासलेली एकुण किमती 91,750/- रुपयाचे रुपयाचे मिळुन आल्याने आरोपी नामे माधव शंकर मंदावाड वय 40 वर्ष व्यवासाय शेती रा. हाळ्दा ता. कंधार पाचेविरुध्द सहा. पोलीस निरीक्षक श्री रवि वाहुळे स्थागुशा नांदेड यांचे फिर्यादवरून पोलीस ठाणे उस्माननगर येथे गुरनं 57/2024 कलम 20(b)ii (b) NDPS ACT प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, नायब तहसीलदार/ डी. डी. लोढे, सपोनि रवि वाहुळे चंद्रकांत पवार, पोउपनि आनंद बिचेवार, गाढेकर, सपोउपनि / माधव केंद्रे, पोह/ गंगाधर कदम, गुंडेराव करले रुपेश दासरवार, पोना/संजिव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, पोकों/देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, वालाजी यादगीरवाड चालक पोकों/हेमंत बिचकेवार, कलीम शेख बालाजी मुंडे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!