नांदेडसोशल वर्क

समाज कल्याण कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

नांदेड। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांचे वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बाहादुर शास्त्री यांची जयंती प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन मधील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली . या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, सहाय्यक लेखाधिकारी डी.वाय. पतंगे व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!