नवीन नांदेड। हडको बालाजी मंदिर देवस्थान आनंदसागर हौसिंग सोसायटी हडको नवीन नांदेडच्या 21 वा दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. 15 ते 24ऑक्टोंबर 230 दरम्यान सकाळी व सायंकाळी दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य आचार्य पंडिताचा मार्गदर्शन खाली पुरोहित सतिश गुरू पोतदार,विनायक गुरू परळीकर,इंद्रमुनी दुबे,प्रकाश महाराज हे विधीपूर्वक करणार आहेत.यात दि 15 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान दि 15 रोजी सकाळी 4 वाजता सुप्रभात, 5 ते 7 बालभोग, आरती,8 ते 10 ध्वजारोहण, देवता स्थापना,कलश स्थापना,अंकुर रोपण, व होम हवन ने सुरुवात होईल व दुपारी 2 ते 4 विष्णुसहस्त्र नाम सायंकाळी 4 ते 6 होमहवन होणार तर ब्रम्होत्सव दरम्यान सकाळी दैनंदिन व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

बालाजी लक्ष्मी पद्मावती कल्याण उत्सव 22 रात्री 8 ते 10 या वेळेत, 23 रोजी रात्री 6 ते 8 मिरवणूक 24 ऑक्टोंबर रोजी दसरा निमित्ताने सकाळी होम हवन,दैवता विसर्जन,पुरणाहुती, बली प्रदान व प्रसाद वाटप आयोजित करण्यात आला आहे.
होम हवन व कल्याण उत्सव पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान यांच्या उपस्थितीत होणार असून आजीवन प्रसाद भोग यजमान नोंदणी शुल्क 1500/ , व दहा वर्षीय अभिषेक सेवा नोंदणी चालू असून अभिषेक नोंदणी म्हणून शुल्क म्हणून ३१०० रुपये चालु असुन ब्रम्होत्सव मध्ये भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे व दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष विवेकानंद देशमुख,सचिव बालकृष्ण येरगेवार ,कोषाध्यक्ष करणसिंग ठाकूर सहसचिव प्रकाशसिंह परदेशी, संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख ,संतोष वर्मा, बाळासाहेब मोरे,अजय भंडारी ,गोवर्धन बियाणी , सचिन नपाते ,संजिवन राजे चंद्रशेखर चव्हाण, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख, चंद्रशेखर चव्हाण यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version