नांदेडमहाराष्ट्र

हिमायतनगर शहर व परिसरात वीज पोल उभारणी करणाऱ्या ठेकेदारावर महावितरणच्या कोणाची आहे कृपादृष्टी..?

नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील नवीन रत्स्याच्या कडेला वीज पोल उभारणीचे काम सुरु असून, या कामात अनियमितता दिसून येत असल्याने महावितरणच्या ठेकेदारावर कृपादृष्टी कोणाची..? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी उपस्थित करून या कामाबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी बांधकाम विभागाच्या हद्दीत होत असल्याने दुर्घटना झाल्यास महावितरण व ठेकेदार यास जबाबदार राहील..? असे पत्र बांधकाम विभागाने दिल्याने ठेकेदाराचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी नव्याने होत असलेल्या रोडच्या बाजूने वीजवाहिनीसाठी पोल टाकण्याचे काम इन्फ्रा मार्फत सुरु आहे. नवीन पोल उभारण्याचे काम ठेकेदारामार्फत महावितरणच्या देखरेखीत करून घेण्यात येत असून, ठेकेदारावर कोण्या सराईत अभियंत्याची कृपादृष्टी असल्याने कि काय सिमेंटऐवजी दगडी भुकटीचा वापर सर्रास करून पोल उभे केले जात आहेत. त्या खांबाच्या मजबुतीसाठी पाणी टाकून क्युरिंग देखील केली जात नाही. अश्या निकृष्ट प्रकारामुळे नवीन विजेचे खांब वादळी वारा आला तर विद्युत वाहक तारा ओढण्यापूर्वीच आडवे होण्याची भीती व्यक्त केली आहे. रस्त्याला लागूनच म्हणजे रस्त्यापासून केवळ ४ ते ५ फूट अंतरावर उभे केले जात असलेल्या या विजेच्या खांबामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नवीन खांब उभारणीबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. जनभावनाही संतप्त होऊ लागल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी या उभ्या खांबामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सदरचे काम तूर्तास थांबविण्यात आले असले तरी ठेकेदार थातुर माथूर काम करून पलायन करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. अशी माहिती दिल्यानंतर ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता श्री कळसकर यांनी भेट देऊन खमाबा उभाणीची पाहणी केली यावेळी श्री भिसीकर, वामनराव मिराशे, किशनराव वानखेडे, दशरथ हेंद्रे, बालाजी मिरजगावे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

हिमायतनगर शहरापासून ते घारापुर पॉईंट आणि हिमायतनगर पासून पळसपूर भागाकडे होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत तसेच ग्रामीण भागात नवीन विजेचे खांब उभारण्याकामी ठेकेदारांकडून कामे सुरू आहेत. नवीन खांब बसविण्याचे काम सुरू असताना जमिनीमध्ये योग्य आकाराचा खड्डा खणून खांब उभा केल्यानंतर त्यामध्ये खांब उभा राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा वापर करण्याऐवजी ग्रीटचा अधिकाधिक वापर करून सिमेंटचा खर्च कमी करण्याचा प्रकार होत आहे. रस्त्याला लागूनच बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता खांब उभारणी केली जात असल्यामुळे भविष्यात भरधाव वेगातील वाहने खांबाला धडकून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हिमायतनगर तालुक्यात असे प्रकार सर्रास घडून येत असल्याची चर्चा वेळोवेळी होत असून, रात्रीतून डीपी कोणताही शुल्क नं आकारता इतरत्र हलविणे यासह वीजतारा व खांब दुरुस्ती, जुने खांब काढून नवीन खांब उभे करणे, यासह दुरुस्तीच्या नावाखाली शासनाला गंडविले जात आहे. या सर्व प्रकारात येथे अनेक वर्षे नोकरी करत तहान मांडून बसलेल्या सहाय्यक अभियंत्याचेच नव्याने उभे होत असलेल्या पोलचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अभय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या संदर्भात इन्फ्राचे श्री जगदाळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही। तर हिमायतनगर ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता कळसकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, बांधकाम विभागाने महावितरण विभागाला दिलेल्या पत्रानुसार ठेकेदाराला बांधकाम विभागाच्या हद्दीत होत असलेल्या कामामुळे दुर्घटना झाल्यास आपण जबाबदार असाल यासाठी परवानगी घेऊन नियमानुसार काम करा असे पत्र देऊन तात्पुरते काम थांबविले आहे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनेनंतर पुन्हा हे काम केले जाईल असे त्यांनी सांगितले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!