शिवतेज युवा प्रतिष्ठान व सुर्योदय मन्याड फाउंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
लोहा । लोहा तालुक्यातील मौ बोरगाव आ. ता. लोहा येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले श्री गुरु विरशाप्पा महाराज व सय्यद सादाद यांच्या यात्रेनिमित्त महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन एकनाथ पवार साहेब (महाराष्ट्र राज्य शिवसेना संघटक उध्दव बाळासाहेब ठाकरे ) व कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी शंकर लाड ( तहसिलदार लोहा ) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ओमकांत चिंचोळकर ( पोलिस निरीक्षक लोहा ) शिवसेना सहसंपर्कप्रमुख अॅड मुक्तेश्वर भाऊ धोंडगे , नंदाजी इंगळे पाटील ( अध्यक्ष शिवमुद्रा जनकल्याण सेवाभावी संस्था ) गोविंद वडजे पाटील ( सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या प्रमुख उपस्थितीत महालॅबच्या वतीने अगदी मोफत रक्तातील सर्व चाचण्या व नांदेड येथील संजिवनी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल,लोटस मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, मोनार्क मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे तज्ञ डॉ या महाआरोग्य तपासणी शिबीरात उपस्थित राहुन वेगवेगळ्या आजारांवरील तपासणी करण्यात येणार आहेत.
तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड सुध्दा मोफत काढुन देण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन शिवतेज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांनी केले आहे.