नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगांव येथील रहीवाशी सौ. श्रीतेजा निलेश काळबांडे हया प्रभात नगर नांदेड येथील आपल्या माहेरी दिनांक 16.11.2023 रोजी दिपावली सण साजरा करुन सासरी जाण्याकरीता श्रीनगर येथुन अॅटोने आपल्या लहान मुलाना सोबत घेऊन बसस्थानककडे निघाल्या. त्या दरम्याण त्यांची बॅग अॅटोमध्ये विसरून राहुन गेली असल्याचे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन वजीराबाद गाठले होते.
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेडचे अशोक घोरबांड यांना घडलेल्या घटनेची आपबीती कळविली. माझे तहानले बाळ माझ्याजवळ असल्याने त्याचे काळजी व संरक्षणाकडे लक्ष देत असतांना माझी बॅग अॅटोमध्ये राहुन गेली आहे. सदर बँगमध्ये अंदाजे साडेसहा तोळे सोन्याचे दागिणे आहेत. मी माहेरी दिपावळी साजरी करुन सासरी जात आहे, त्यातच माझे सोन्याचे दागिणे हरवले असल्याने शंका कुशंकांना वाव निर्माण करणारी बाब झाली आहे. कृपया मला आपल्या कुटुंबाीतील सदस्य समजुन माझे दागिणे असलेली बॅग शोधुन द्यावी अशी विनंती केली.
सदर विनंती प्रमाणे अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक यांनी सदर महीलेची सोन्याचे दागिणे असलेली बॅग शोधण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकाचे शिवराज जमदडे, सहा. पोलीस निरीक्षक, पोहेकॉ/ दत्तराम जाधव, पोना/ शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, अरुण साखरे, शेख ईम्रान, भाऊसाहेब थोरात यांचेकडे सोपविली.
नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी श्रीनगर नांदेड ते बसस्थानक नांदेड या भागातील विविध ठीकाणचे सिसिटीव्ही फुटेज हस्तगत केले. ज्यामध्ये अॅटोचालकाचे फुटेज हस्तगत झाले परंतु नंबरअस्पष्ट असल्याने शोध घेण्यास अडथळे येत होते. तेव्हा श्री. गंगाधर प्रभाकर विणकरे, अध्यक्ष, पँथर अॅटो संघटना यांची मदत घेऊन अॅटोचालकाचा शोध घेतला. सदर प्रकरणी अॅटोचालकाचे नांव अशोक गंगाराम कांबळे रा. वैशालीनगर, पाटबंधारेनगर नांदेड असे असल्याची खात्री झाली. त्यावरुन त्यांचेकडे विचारणा करता त्यांनी सदर महिलेची बॅग जशास तशी माझेकडे असुन महीलेबाबत काहीएक माहीती मिळत नसल्याने मी सदर बॅग कोणाकडेही सुपुर्द केली नाही असे प्रामाणीकपणे कळवून बॅग समक्ष हजर केली. त्यामध्ये सदर महिलेचे साडेसहा तोळयाचे दागिणे ज्यामध्ये ती सोन्याचे हार मिळुन आले.
आज दिनांक 22.11.2023 रोजी मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर, अॅटोचालक यांचे उपस्थितीमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड याठीकाणी अॅटोचालक अशोक गंगाराम कांबळे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच श्री. गंगाधर प्रभाकर विणकरे, अध्यक्ष, पॅथर अॅटो संघटना यांचा व अॅटोमधील हरवलेल्या बॅगचा शोध घेणाऱ्या वजीराबाद पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार केला आहे. सदर वेळी मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी अॅटोचालकास स्वतःतर्फे 1,000/- रुपयाचे बक्षीस दिले. तसेच सौ. श्रीतेजा काळबांडे यांनी अॅटोचालक यांचा सपत्नीक आहेर व बक्षीस देऊन सत्कार केला आहे.
सदर वेळी सौ. श्रीतेजा निलेश काळबांडे हया व त्यांचे कुटुंबीय भावनीक होऊन माझी दिपावली नांदेड पोलीसांनी भाऊबीज स्वरुपी साजरी केल्याचे मत व्यक्त केले व नांदेड पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.