वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। तालुक्यातील दुय्यम दर्जाची असलेली पोटा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मीबाई बापुराव जाधव यांनी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर पंचायत समिती हीमायतनगर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
पोटा बुद्रुक येथील ग्रामपंचायत ग्रामीण भागातील सर्वात मोठी असून एकूण अकरा उमेदवार ग्रामपंचायत मध्ये आहे गावातील सर्व नागरिकांच्या सहमतीने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली होती सरपंच पदासाठी श्रीमती लक्ष्मीबाई बापुराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती तर उपसरपंच पदी माधव डोकळे निवड झाली होती. श्रीमती लक्ष्मीबाई जाधव यांनी सरपंच पदाचे सूत्र हातात घेऊन त्यांनी अडीच ते तीन वर्षाच्या कार्यकाळात गावांचा विकास कामांमध्ये चेहरा मोहरा बदलून टाकला.
दलित वस्ती घरकुल सीसीटी रस्ते पाणीपुरवठा विद्युत पुरवठा आधी कामाकडे लक्ष देऊन गावातील अनेक घटकांची समस्या सोडवली. त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव त्यांनी सरपंच पदाचा दिनांक 20 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर यांना लेखी निवेदनाद्वारे दिला त्यांनी तो स्वीकारला यावेळी ग्रामपंचायत सदस्य घुमणर सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय पवार हे उपस्थित होते.
गावकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही
पोटा बुद्रुक गावकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून बिनविरोध सरपंच पदी आमच्या आईची निवड केली होती गावकऱ्यांनी दिलेली संधी व अनेकांचे विकास कामासाठी रखडलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता नागरिकांनी केलेला आमच्यावरील विश्वास आम्ही सार्थ ठरवून अर्धवट असलेल्या विकास कामांचा व अनेक नवनवीन योजना राबवून गावचा साधलेला विकास केला यापुढेही वेळोवेळी गावातील राजकीय सामाजिक धार्मिक सर्वच क्षेत्रांमध्ये आम्ही सहकार्य करू व नागरिकांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू असे वक्तव्य सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय पवार यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना केले.