नांदेड
वासवी क्लब, नविन नांदेड आयोजीत गजर हरी नामाचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
नवीन नांदेडl सिडको वासवी क्लब व वासवी वनीता
क्लब आयोजित, स्वरांजली प्रस्तुत “गजर हरी नामाचा” हा भक्ती गीतांचा संगीतमय, सुरेल कार्यक्रमाचे दि. 17 जुलै रोजी गोविंद गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकादशीचे औचित्य साधुन सुरांची उधळण करीत सलग 12 व्या वर्षी एकअनोखा, अनुभव सोहळा संध्याकाळी 4 वाजता ” गजर हरी नामाचा” सोबत आर्य वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे दोन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविक,भक्तांनी या भक्ती सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन सिडको वासवी क्लबचे अध्यक्ष संदीप येरावार,सचिव बालाजी कवटिकवारआणि कोषाध्यक्ष मयुर बिडवई आणि वासवी व वासवी वनिता क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
